Manoj Jarange: अंतरवाली ते मुंबई.. मराठा आरक्षणाचा लढा, पाहा जरांगेंच्या कुटुंबीयांनी काय केलं…

रोहिणी ठोंबरे

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज (20 जानेवारी) मराठा समाज (Maratha Reservation) बांधवांसह मोठ्या संख्येने मुंबईकडे निघणार आहेत. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त वडीगोद्री फाटा येथे लावण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज (20 जानेवारी) मराठा समाज (Maratha Reservation) बांधवांसह मोठ्या संख्येने मुंबईकडे निघणार आहेत. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त वडीगोद्री फाटा येथे लावण्यात आला आहे. होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान, शीघ्र कृती दलाचे जवान असे सुमारे दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त रस्त्यात ठिकठिकाणी लावण्यात आला आहे.

मनोज जरांगे पाटलांचा मुंबई दौरा शांततेत पार पडावा आणि यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून ठिकठिकाणी पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची ही या पायी पद यात्रेवर राहणार आहे.

वाचा : Ayodhya Ram Mandir: शिंदे सरकारचा मोठा निर्णय, 22 जानेवारीला महाराष्ट्रात…

सरकारने मराठा समाजाचा अंत न पाहता आरक्षण द्यावे- जरंगे पाटलांच्या कुटुंबीयांच्या भावना

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धे मनोज जरंगे पाटील आज (20 जानेवारी) मुंबईकडे समाज बांधवांसह निघत असून त्यांना पाठिंबा व शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पत्नी, वडील, त्यांचा मुलगा व मुलगी देखील त्यांच्यासोबत पायी चालणार आहेत. जरंगे पाटलांचे महाकाळा येथे आगमन होताच सुवासिनी त्यांचे औक्षण करतील तर नंतर त्यांचा परिवार देखील शहागड पर्यंत त्यांच्यासोबत या यात्रेत पायी चालणार आहे.

वाचा : Uddhav Thackeray: ‘तिथे जे नालायक लोकं बसलेत ते हिंदुत्वात..’, ठाकरेंचा पुन्हा संताप

आज अखेर मनोज जरंगे पाटलांना मुंबईकडे कूच करण्याची वेळ पडलीच आहे त्यामुळे सरकारने आता तरी मराठा समाजाचा अंत न बघता समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी केली आहे. सात महिने झाले तरी जरांगे पाटील घरी आले नसल्याने कुटुंबाला अश्रू अनावर झाले असून आता तरी हा लढा लवकर संपावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाचा : कोण आहे Shrushti Deshmukh?; IAS Tina Dabi नंतर इंटरनेटवर तुफान चर्चा

आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटी आज (20 जानेवारी) अंतरवाली सराटीतून निघतील. 26 जानेवारीला हा मोर्चा मुंबईत धडकेल. शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमरण उपोषणाला ते सुरुवात करणार, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसंच मोर्चासाठी जरांगे पाटील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp