Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा आरक्षणाची ‘ती’ याचिका सुप्रीम कोर्टाने स्विकारली, पण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Supreme Court Accept Curative  Petition Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) एकीकडे आरक्षणासाठी आंदोलनाची दिशा ठरवत असतानाच, दुसरीकडे मराठा आरक्षणा (Maratha Reservation)  संदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका (Curative Petition) सर्वोच्च न्यायालयाने स्विकारली आहे. आता या क्युरेटिव्ह याचिकेवर येत्या 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)  सुनावणी पार पडणार आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच काय निर्णय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. (maratha reservation curative petition accepted by supreme court January 24 hearing vinod patil)

ADVERTISEMENT

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर येत्या 24 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. चार न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे.मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या खंडपीठाने आता 24 जानेवारीला या प्रकरणावर विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, न्यायमूर्ती संजय किशन कौल 25 डिसेंबरला निवृत्त होत आहेत. हे शक्य आहे की सीजेआय त्यांच्या जागी आणखी एका न्यायाधीशाचा खंडपीठात समावेश करू शकतात.

हे ही वाचा : Manoj Jarange: ‘तुझ्या डोक्यात गटार भरल्यासारखे किडे आहेत..’, जरांगेची भुजबळांवर जहरी टीका

विनोद पाटील काय म्हणाले?

क्युरेटीव्ह याचिकेवर मा. न्यायालयाने भाष्य केले आहे. येत्या 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने क्युरेटीव्ह याचिकेवर सुनावणी ठेवली आहे. याचा अर्थ असा क्युरेटीव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने नाकारली नाही. तर सुप्रीम कोर्टाने स्विकारलेली आहे. यामुळे मला विश्वास आहे,लवकरात लवकर यावर सुनावणी होईल आणि मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे, असा दावा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Vivek Bindra : कानाचा पडदा फाटला, पत्नीला मारहाण…मोटिव्हेशनल स्पीकर बनला सैतान!

जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकणार

मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली दोन महिन्यांची मुदत ही उद्या (24 डिसेंबर) संपणार आहे. त्यामुळे आज (23 डिसेंबर) बीडमध्ये इशारा सभा घेत मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी नवा डाव टाकला आहे. अतंरवाली सराटीतून आरक्षण सुरू करून ग्रामीण भागातील मराठा समाजाला एकवटणाऱ्या मनोज जरांगेंनी आता थेट मुंबईला धडक देण्याचं जाहीर केलं आहे. जरांगेंनी आता मुंबईत येऊन आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा यावेळी केली आहे. यासाठी त्यांनी सभेतील सर्वांना विचारून 20 जानेवारी ही उपोषणाची तारीख निश्चित केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT