Maratha Reservation : जरांगेंचा अल्टिमेटम संपण्याआधीच शिंदे सरकारची जाहिरात, मुद्दा चिघळणार?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

Maratha Reservation : Manoj Jarange Patil ultimatum will over on 24 october
Maratha Reservation : Manoj Jarange Patil ultimatum will over on 24 october
social share
google news

Maratha Reservation Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं उपोषण सोडल्यानंतर जरांगेंनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली होती. ती मुदत २४ ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे सरकार काय भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना सर्व वर्तमानपत्रांमध्ये शिंदे सरकारकडून एक जाहिरात देण्यात आली आहे. एकीकडे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झालेला असताना आता प्रसिद्ध झालेली EWS आरक्षणाची जाहिरात कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

ADVERTISEMENT

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. जरांगे सध्या राज्यातील विविध भागांमध्ये सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्र देण्याची जरांगे यांची मागणी आहे.

जरांगेंनी सरकारला दिला अल्टिमेटम

जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराटी येथे गेले होते. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटलांनी ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम आता २४ ऑक्टोबरला संपतो आहे. राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावच लागेल असं जरांगे पाटील ठणकावून सांगत आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा >> Maratha Reservation : 50 टक्क्यांची मर्यादा आली कारण…, सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

सधींचं सोने करा… जाहिरातीत नेमकं काय?

एकीकडे जरांगे पाटील यांनी दिलेली वेळ संपत असताना आता दुसरीकडे राज्य सरकारकडून वृत्तपत्रामंमध्ये मोठी जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये EWS आरक्षणामुळे मराठा समाजाला कसा फायदा झाला आहे, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ‘शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोने करा…’ असं या जाहिरातीच्या सुरुवातीला म्हटंल आहे, त्याचबरोबर ‘आम्ही पाया मजबूत बनविला आहे… सकारात्मक ध्येयाकडे वाटचाल करा’ असं देखील या जाहीरातीच्या सुरुवातीला म्हटलं आहे.

हेही वाचा >> Pune : पुण्यातील रस्त्यावर थरार! मद्यधुंद बसचालकाने उलटी पळवली बस, 15 वाहनांना उडवले

त्यापुढे ‘मा. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय EWS करिता १० टक्के आरक्षणावर मोहोर उमटवली. EWS आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ’ असं देखील यामध्ये लिहिण्यात आलं आहे. त्यानंतर सारथी आणि इतर योजनांबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर मराठा समाजासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

संपूर्ण जाहिरातीत काय पहा…

Maratha Reservation : maharashtra government published ews advertisement in newspapers
मराठा आरक्षणाची मागणी होत असताना राज्य सरकारकडून मराठा समाजासाठी सरकारकडून देण्यात आलेल्या लाभाची माहिती देणारी जाहिरात.

द्वेष करू नका

या जाहिरातीवर आता अनेक प्रतिक्रिया देखील उमटताना दिसत आहेत. मराठा आरक्षणाच्या ऐवजी सरकारने EWSचा पर्याय पुढे केला असल्याचं म्हणण्यात येत आहे. ‘जाहिरात आणून द्वेष करु नका’ अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी चिघळू शकतो, असंही म्हटलं जात आहे. आता या जाहिरातीवरुन कुठलं राजकारण होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT