MNS Jagar Padyatra: अमित ठाकरे म्हणाले पुढच्या वर्षी राज ठाकरेंची सत्ता येईल, तेव्हा…
MNS Jagar Padyatra Amit Thackeray: मुंबई-गोवा महामार्गवरील खड्डे आणि रखडलेलं काम याविरोधात मनसेने पदयात्रा सुरू केली आहे. जी अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात सुरू आहे. याच वेळी बोलताना अमित ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT
MNS Jagar Padyatra : रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) रखडलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) वतीने आज (रविवारी 27 ऑगस्ट) लांजा तहसील कार्यालय ते वेरळ अशी पायी पदयात्रा काढण्यात आली असून या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मनसे नेते आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढण्यात येत आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे म्हणाले की, पुढच्या वर्षी राज ठाकरे सत्तेत आले की, हा रस्ता संपूर्णपणे नीट झालेला पाहायला मिळेल. (mns jagar padyatra march on mumbai goa highway under the leadership of amit thackeray targeting the Shinde government)
ADVERTISEMENT
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेला कामाचा फटका हा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी तसेच कोकणवासीय जनता आणि पर्यटक यांना बसत आहे. तमाम कोकणवासीयांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकारे आंदोलन करत आहे. आणि निवेदन देखील प्रशासनाकडे सादर करत आहे. तर कधी लोकशाही पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली जात आहे.
हे ही वाचा >> INDIA@ 100: ‘हे’ तंत्रज्ञान म्हणजेच भारतासाठी यशाची लांब उडी!
याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण कोकणात महामार्गावर लोकशाही पद्धतीने विविध ठिकाणी पदयात्रा काढून सरकार आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 190 किमीमध्ये आठ टप्प्यात पदयात्रा आंदोलन केले जाणार आहे.
‘माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही म्हणणार असाल तर..’, अमित ठाकरेंची सरकारवर टीका
’17 वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही म्हणणार असाल तर ह्या खराब रस्त्यामुळे अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय म्हणायचं?’ असा सवाल अमित ठाकरेंनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांना विचारण्यात आला.
‘मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय… पण तरीही काही सुधारणा होणार नसेल पुढचं आंदोलनात अधिक तीव्र, आक्रमक महाराष्ट्र सैनिक आणि कोकणी माणूस तुम्हाला अनुभवायला मिळेल. ही यात्रा शांततेत आहे.. पण पुढची यात्रा शांततेत नसेल.’
‘आम्ही आता चर्चेत सहभागी नाही होणार.. आम्ही शेवटचं सांगतोय की, ही यात्रा शांततेत आहे. याच्या पुढची यात्रा ही शांततेत नसेल. जे तुम्ही घाबरत होतात ना तेच घाबरत राहा.. तुम्हाला ज्या केसेस करायच्या त्या करा. आम्ही लोकांसाठी लढत राहू. गेली 17 वर्ष हा रस्ता सुरू आहे. मला वाटतं आपण चंद्रावर स्वस्तात पोहचलो. 600 कोटीत पोहचलो.. पण 15 हजार कोटींचा हा रस्ता अजूनही सुरू आहे. अजूनही तात्पुरते खड्डे बुजवता. मला वाटतं पुढच्या वर्षी राज साहेब सत्तेत आल्यावर पूर्णपणे करून मिळेल सगळं.’
‘देशद्रोही वैगरे बोलून काही फरक पडणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढत राहणार आहोत. हा मोर्चा शांततेत आहे पण पुढचा शांततेत नसेल.’ असा इशारा अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
“१७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही म्हणणार असाल तर ह्या खराब रस्त्यामुळे अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय म्हणायचं ? मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय…… pic.twitter.com/2JKQKh7aUJ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 27, 2023
हे ही वाचा >> Ajit Pawar : ‘…म्हणून पहाटे 5 वाजताच काम सुरू करतो’,अजितदादांनी सांगितलं कारण
लांजा येथे तहसील कार्यालय ते वेरळ यादरम्यान ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता लांजा तहसील कार्यालय येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. या पदयात्रेत जिल्हा संपर्क अध्यक्ष तथा मनविसे उपाध्यक्ष मनीष पाथरे यांच्यासह रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर तसेच पक्षाच्या सरचिटणीस नयन कदम या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तालुका जिल्ह्यातील सुमारे 400 पदाधिकारी, कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे मनीष पाथरे यांनी सांगितले. ही पदयात्रा संपल्यानंतर सायंकाळी कोलाड येथे होणाऱ्या पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला हे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT