मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी, पोलिसांना मेसेज आल्याने खळबळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई ट्रॅफिक कंट्रोल विभागाला २६/११ सारखा हल्ला पुन्हा घडवला जाईल अशी धमकी देणारा मेसेज आला आहे. त्यामुळे पोलीस विभाग सतर्क झाला आहे. भारताबाहेरच्या क्रमांकावरून हा मेसेज मुंबईच्या वाहतूक विभागाला देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि सर्व यंत्रणा अलर्टवर गेली आहे. या प्रकरणी अधिकचा तपासही केला जातो आहे. दोन दिवसांपूर्वीच एक बोट हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर आढळली होती. त्या पाठोपाठ आता मुंबईवर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाला नेमकी काय धमकी आली आहे ?

मुंबईवर २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्यात येणार आहे अशी धमकी मुंबई वाहतूक पोलिसांच्या What’s App नंबरवर पाठवण्यात आली आहे. ज्या नंबरवरून हा मेसेज आला आहे तो पाकिस्तानशी संबंधित आहे. सहा लोक हा हल्ला करतील असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. मुंबई पोलीस या प्रकरणी पुढील चौकशी करत आहेत.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काय म्हटलं आहे?

मुंबईला आलेल्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत अजित पवार यांना नागपूरमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अजित पवार म्हणाले की, “अनेक वेळेला अशा धमक्या येतात, अनिल अंबानींच्या कुटुंबाला धमकी आली होती, अनेक वेळेला माथेफिरू असे उद्योग करतात… तरी ही अशा धमक्या गांभीर्याने घेतल्याच पाहिजे, राज्य पोलीस दल आणि केंद्रीय यंत्रणा सक्षम आहे… सरकारने या गांभीर्याने दखल घ्यावी.” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

मुंबईत २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात शस्त्रांनी भरलेली बोट सापडल्यानंतर आता मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी आल्याने काळजी वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत दहशदवाद्यांशी संबंधित बातम्यांनी सुरक्षा यंत्रणांची झोप उडवली आहे. या दहशतवादी धमकीने मुंबईसह देशाचं टेन्शन वाढवले आहे. मुंबईला उडवून देण्याची धमकी पाकिस्तानातून आली आहे. मुंबई पोलीस कंट्रोल रुमला ही धमकी आली आहे. तर शुक्रवारी काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या हवाला एजंटला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या मोहम्मद यासीन याला अटक केली आहे. तर त्याआधी रायगडच्या हरिहरेश्वर समुद्र किनारी बेवारस बोटीत घातक शस्त्रास्त्रं सापडली होती. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोटीचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. पण, या सर्व घटनांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT