‘माझ्या आजीसमोर रश्मिका पाणी कम चाय’,असं का म्हणाले सदावर्ते?
ॲड. गुणरत्न सदावर्ते अनेक कारणामुळे नेहमची चर्चेत असतात. कधी त्यांच्या हावभावावरून तर कधी राजकीय वक्तव्यावरूनही. आताही त्यांनी त्यांच्या आजीची आठवण करून सांगताना म्हणाले की, माझी आजी इतकी सुंदर होती की, अभिनेत्री रश्मिका मंदान्नापेक्षाही ती अधिक सुंदर होती असं त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ADVERTISEMENT
Gunaratna Sadavarte : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन चाललेल्या संपानंतर शरद पवार यांच्या घरावर त्यांचा मोर्चा चालून गेला होता. त्या घटनेनंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले होते. गुणरत्न सदावर्ते अनेक गोष्टींमुळे त्यानंतर सातत्याने चर्चेत आले आहेत. आताही ते पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) चाललेल्या आंदोलनावरून चर्चेत आले आहेत. कारण मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) आंदोलनानंतरही त्यांनी मराठा आरक्षणाला जाहीर आव्हान दिले आहे, मराठा आरक्षणावर बोलत असतानाच त्यांनी एका मुलाखतीत त्यांचा आजपर्यंत झालेला प्रवास, राजकारण, समाजकारण आणि वकील म्हणून त्यांनी केलेली वाटचाल याविषयी त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या आजीचीही (grandma) एक आठवण सांगितली आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, माझी आजी रश्मिका मंदान्नापेक्षाही (Rashmika Mandanna ) सुंदर होती असंही मत त्यांनी व्यक्त केले.
ADVERTISEMENT
अनेक आठवणींना उजाळा
ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेल्या मुलाखतीत आपल्या घराण्याविषयी बोलताना अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी आपले शिक्षण आणि घरातील गुन्हेगारीविषयीचे असलेली पार्श्वभूमी कशी होती. त्यांचे वडील म्हणजे त्यांच्या घरातील शेवटचे बालगुन्हेगार होते हे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या आजोबांनी शेवटचा दरोडा हा माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घरावर टाकणार होते अशी आठवणही त्यांनी बोलून दाखवली.
हे ही वाचा >> उसाच्या शेतात रंगेहाथ पकडलं, तरुणांनी प्रेमीयुगुलाला दिली भयानक शिक्षा
माझी आजी इतकी सुंदर
गुणरत्न सदावर्तें यांनी आपल्या आयुष्यातील अनेक आठवण सांगताना त्यांनी त्यांच्या आई आणि आजीचीही एक आठवण सांगितली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘माझी आजी इतकी सुंदर होती की, ती रश्मिका मंदान्ना वगैरे हिरोईन आहेत ना, ती माझ्या आजीसमोर कोणी नाही. पाणी कम चाय, इतकी ब्युटीफुल होती, म्हणजे अगदी रशियन टाईप. उंची सहा फूट, एकदम स्लीम, फेस एकद व्ही कट अशा शब्दात त्यांनी आपल्या आजीचे सौंदर्याचे त्यांनी कौतुक केले आहे.
हे वाचलं का?
सदावर्ते आरक्षणावर पुन्हा बोलले
घरी गुन्हेगारीची पार्श्वभूमी असली तरी आपल्या त्यांच्या आईला ते डॉक्टर बनावे असं वाटत होते,आणि त्यांच्या आईमुळेच त्यांनी शिक्षणाची कास धरून प्रगती कशी केली हेही त्यांनी यावेळी सांगितले. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी बोलताना त्यांच्या कुटुंबीयांविषयी त्याचबरोबर त्यांच्या कारकीर्दीविषयी आपलं मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर बोलताना पुन्हा एकदा ते मराठा आरक्षण मिळताना काय समस्या येऊ शकतात, मराठा समाज कसा मागास आहे हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हे ही वाचा >> NCP : सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार, मराठा आरक्षणावरील आरोपांवर काय म्हणाल्या?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT