‘… तर मराठ्यांना आरक्षण देणं शक्य’; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितला कायदा

मुंबई तक

ADVERTISEMENT

possible give reservation maratha community under article 14/15, constitutional expert Ulhas Bapat opinion
possible give reservation maratha community under article 14/15, constitutional expert Ulhas Bapat opinion
social share
google news

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. त्यानंतर जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमधील आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्या लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाले. त्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्यावरुन ओबीसी आरक्षणाचाही (OBC Reservation) मुद्दा उपस्थित करण्यात आला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीमधून मराठा सामजाला आरक्षण देणार असेल तर तसे आरक्षण देऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, जर ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार असाल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर घटनातज्ज्ञ प्रा. उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी घटनेचा संदर्भत देत मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य असल्याचे सांगत त्यावरुन ओबीसी समाजाने कोणताही आक्षेप घेण्याचं कारण नसल्याचे त्यांनी मुंबक तकशी बोलताना सांगितले. (possible give reservation maratha community under article 14/15, constitutional expert Ulhas Bapat opinion)

ओबीसी आरक्षणात समावेश

मराठा आरक्षणाचा मुद्दा मनोज जरांगे-पाटील यांच्यामुळे पुन्हा एकदा प्रचंड चर्चेत आला. त्यानंतर आता घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी कायद्याचा संदर्भ देत मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य असल्याचे सांगत त्यांनी घटनेच्या कलम 14/15 अंतर्गत आरक्षण देणं शक्य आहे असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा >> Maratha Morcha : ‘…तरच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या’, विजय वडेट्टीवारांचा भूमिका काय?

आरक्षण देणं शक्य

प्रा. उल्हास बापट यांनी मराठा समाजाला आरक्षण देणे शक्य असल्याचे म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचा ओबीसीमध्ये त्यांचा समाविष्ट करून त्यांना आरक्षणाचा लाभ देणे शक्य असल्याचे सांगितले. कलम 14/15 नुसार जरी त्यांना आरक्षण दिले तरी त्यामुळे कोणत्याही गोष्टींचे उल्लंघन होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

उल्लंघन होणार नाही

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षणातून जर मराठा समाजाला आरक्षण दिले तर तसे होऊ देणार नाही. जर ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर ओबीसीचा टक्का वाढवा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र उल्हास बापट यांनी या प्रकारच्या आरक्षणाचे कोणतेही उल्लंघन नाही असं त्यांनी सांगितले आहे.

आक्षेप घेऊ नये

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार अशा जोरदार चर्चा आत सुरु झाल्या आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी मागणीही होऊ लागली आहे. त्यावर उल्हास बापट यांनी घटनेच्या कलम 14/15 अंतर्गत आरक्षण देणे शक्य असल्याने ओबीसी समाजाने विरोध करणे अथवा त्यावर आक्षेप घेऊ नये असं मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा शिंदे सरकारला अल्टिमेटम! घेणार मोठा निर्णय

    follow whatsapp

    ADVERTISEMENT