Eknath Shinde: "नराधम कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर...", पुणे बलात्कार प्रकरणावर DCM शिंदेंचं मोठं विधान!
DCM Eknath Shinde On Pune Rape Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी फरार आरोपी दत्तात्रेय गाडेचा पोलिसांकडून शोध शुरु आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पोलिसांकडून फरार आरोपी दत्तात्रेय गाडेचा शोध सुरु

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली मोठी प्रतिक्रिया

"मी स्वत: पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो, यावर कठोर कारवाई..."
DCM Eknath Shinde On Pune Rape Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी फरार आरोपी दत्तात्रेय गाडेचा पोलिसांकडून शोध शुरु आहे. बलात्काराच्या घटनेमुळं संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नराधम कोणत्याही पक्षाचा असो, कारवाई होणारच. लाडक्या बहिणी सुरक्षित राहायला पाहिजेच अशी आमची भूमिका आहे, असं मोठं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?
"मुख्यमंत्री स्वत: त्यामध्ये लक्ष घालून आहेत. अजितदादा लक्ष देत आहे. मी स्वत: पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो. यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिल्या आहेत. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत अटक होईल. त्याचे सगळे लागेबांधे आहेत, ते पोलिसांच्या हाती आले आहेत. लाडक्या बहिणींना एसटीत जास्तीत जास्त प्रवास करता यावा, त्यांना सोपं व्हावं म्हणून 50 टक्के सवलतही दिली, असं शिंदेंनी म्हटलं आहे.
हे ही वाचा >> Vasant More : वसंत मोरेंना थेट मातोश्रीवरुन फोन, स्वारगेटवर तोडफोड केल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?
परंतु, अशाप्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील, तर त्यात कुणालाही सोडलं जाणार नाही. त्यांची खैर केली जाणार नाही. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. अशाप्रकारचं सरकारचं धोरण आणि भूमिका आहे. कोणीही कोणत्याही पक्षाचा असूद्या, कुणाशीही संबंधीत असूद्या, अशाप्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही. कुणाशीही संबंध असू द्या, कुणाशीही लागेबांधे असूद्या..हा गुन्हेगार गुन्हेगार आहे. लाडक्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही", असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा >> Financial Fraud : भरगोस परताव्याच्या नादात कोट्यवधींची गुंतवणूक, ठाण्यात 20 जणांना गंडा घातला
26 फेब्रुवारीला बुधावरी पहाटे 5:30 वाजता पुण्यातील एसटी स्टँडवर ही धक्कादायक घटना घडली. 26 वर्षांची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती, स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली असताना आरोपीने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीने आरोपीला सांगितलं. मात्र, एकट्या मुलीचा फायदा घेत त्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.