पुण्यात भर चौकात लघुशंका आणि अश्लील चाळे करणारा गौरव आहुजा सापडला, पोलिसांनी 'इथून' उचलला

ओमकार वाबळे

Pune Crime News: पुण्यात, ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबवून लघुशंका करणाऱ्या एका तरुणाला आणि त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून दोघेही फरार होते.

ADVERTISEMENT

गौरव आहुजा सापडला, पोलिसांनी 'इथून' उचलला
गौरव आहुजा सापडला, पोलिसांनी 'इथून' उचलला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यात भर चौकात लघुशंका करणारा तरूण अटकेत

point

गौरव अहुजा आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी केली अटक

point

कराडमधून गौरव आहुजाला करण्यात आली अटक

Gaurav Ahuja Arrest: पुणे: पुण्यात एका तरुणाचा बीएमडब्ल्यूमधून उतरून ट्रॅफिक सिग्नलवर लघुशंका आणि अश्लील हावभाव करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावेळी त्या तरुणाचा मित्रही त्याच्यासोबत होता आणि तो दारूची बाटली घेऊन गाडीत बसला होता. या सगळ्याचे व्हिडिओ समोर आल्यानंतर पुणेकरांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. त्यामुळे हे कृत्य करणाऱ्या या तरुणाचा शोध पुणे पोलीस घेत होते. अखेर आता त्याला सातारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

गाडीत उपस्थित असलेल्या तरुणालाही अटक करण्यात आली

ट्रॅफिक सिग्नलवर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजा व्यतिरिक्त, भाग्येश ओसवाल याला देखील अटक करण्यात आली आहे. आहुजासोबत भाग्येशही गाडीत उपस्थित होता. व्हायरल व्हिडिओच्या आधारे, पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत उपद्रव, बेदरकारपणे वाहन चालवणे, सार्वजनिक रस्त्यावर धोका निर्माण करणे यासह विविध गुन्ह्यांची नोंद केली आहे.

हे ही वाचा>> Pune: काकूसोबत अनैतिक संबंध, पण अचानक बिबट्याच्या हल्ल्याचा अँगल का आला मधे?

या घटनेची माहिती देताना येरवडा पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'ओसवाल याला संध्याकाळी त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, व्हिडिओ समोर आल्यापासून फरार असलेल्या गौरव आहुजा याला रात्री उशिरा सातारा येथील कराड तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.' 

ओसवाल पुढच्या सीटवर बसला होता

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, ओसवाल आपल्या आलिशान कारच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहेत तर गौरव आहुजा ट्रॅफिक जंक्शनवर लघुशंका करताना दिसत आहे. तसंच या घटनेचा व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीकडे पाहून तो अश्लील हावभाव करत असल्याचेही दिसत आहे.

हे ही वाचा>> Pune Police : पुण्यात 'खाकी'लाही भाईगिरीचा नाद? पोलिसाचं गुन्हेगारांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन

आहुजाने मागितली माफी

पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी, गौरव आहुजाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट केली होती आणि त्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली होती. व्हिडिओमध्ये गौरव आहुजा म्हणतो, "कृपया मला एक संधी द्या. मी पुढील आठ तासांत आत्मसमर्पण करेन."

दरम्यान, त्याधीच त्याला पोलिसांनी अटक करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणामुळे पुणेकर मात्र चांगलेच संतापले असून गौरव अहुजाला चांगली अद्दल घडवावी अशी मागणी करत आहेत.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp