Mumbai-Pune Expressway वरची कोंडी सुटणार? मिसिंग लिंक प्रोजेक्ट नेमका काय, किती अंतर कमी होईल?
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढतच जातेय. त्यामुळे लोकांना तासंतास वाहतूक कोंडीत उभं राहावं लागतं. अंदाजे 3 ते साडेतीन तासांच्या या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे कधीकधी 6 तास लागतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

ड्रोनमध्ये कैद झालं वाहतूक कोंडीचं चित्र

मिसिंग लिंकमुळे सुटणार का वाहतूक कोंडीची समस्या?
मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा एकमेव रस्ता म्हणजे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग. कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याचा बराचसा भाग हा मुंबई गाठण्यासाठी याच महामार्गाचा उपयोग करतो. मात्र, गेली अनेक वर्ष या रस्त्याची चर्चा होतेय ती फक्त वाहतूक कोंडीमुळेच. वाहनांच्या लांबच लांब रांगा, तासंतास अडकलेले वाहनं आणि गुदमरलेले प्रवासी असंच या महामार्गाचं चित्र कायम असतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हाच लोड कमी करण्यासाठी लोणावळ्याजवळ मिसिंग लिंकही तयार करण्यात येतोय. वाहतूक कोंडींच्या या समस्येसोबतच आता नव्यानं होणाऱ्या मिसिंग लिंकचीही चर्चा सुरू झाली आहे.
हे ही वाचा >> पुण्याच्या पोर्शे कार अपघातासारखीच घटना! मद्यधुंद तरूण, 120 चा स्पीड, भीषण अपघाता तिघांचा मृत्यू, 5 जखमी
मुंबई-पुणे हा भारतातील पहिला 6-लेनचा काँक्रीटने तयार केलेला दोन्ही बाजूंनी बंदीस्त असलेला महामार्ग आहे. 94.5 किमीच्या या महामार्गावर गेल्या कित्येक वर्षांपासून वाहतुकीचा मोठा लोड आहे. त्यामुळेच आता या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून मिसिंग लिंक तयार करण्यात येतोय. पण या नव्या मिसिंग लिंकचा फायदा होणार का? ही गर्दी कमी होणार का? ही चिंता मात्र, वाहनचालकांच्या मनात कायम आहे.
हे ही वाचा >> Mumbai Police : नियम मोडणाऱ्यांचा रंग उतरवला, मुंबई पोलिसांनी वसुल केला पावणे 2 कोटी रुपयांचा दंड
मिसिंग लिंक प्रकल्पाचा काय फायदा होणार?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर लोणावळा खंडाळ्याजवळ मोठं घाट क्षेत्र आहे. तिथे कायम वाहतूक कोंडी होत असून, वाहनांना वळसा घालत पुढे जावं लागतं. सध्याच्या एक्सप्रेसवेवरचा 'खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंतचा भाग' 19 किमी लांब आहे. हा संपूर्ण घाट आणि चढ उतार टाळून थेट बाजूने दुसरा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामध्ये दोन मोठे बोगदे आणि पूल आहे. त्यामुळे या मिसिंग लिंकच्या बांधकामानंतर हे 19 किमीचं ते अंतर 13 किमी होईल. त्यामुळे, मुंबई ते पुणे एक्सप्रेस वेची एकूण लांबी 6 किमीने कमी होईल. प्रवासाचा वेळ 20-25 मिनिटांनी कमी होईल.
हे ही वाचा >> Beed : "...म्हणून मी जीवन संपवतोय", त्रास देणाऱ्यांची नावं लिहून फेसबूक पोस्ट करत शिक्षकाचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचं 92 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालं आहे. मात्र, लोणावळ्याजवळ बांधण्यात येत असलेल्या केबल पुलाच्या कामाला उशीर झाला होता. प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2024 ठेवण्यात आली होती, मात्र नंतर ती वाढवण्यात आली. 13.3 किमी लांबीचा हा मिसिंग लिंक प्रकल्पआता ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होईल असं सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार आणि कधी मुंबई-पुणे दृतगती महामार्ग मोकळा श्वास घेणार यावर सर्वांचं लक्ष आहे.