Pune : अरिजित सिंगच्या कॉन्सर्सटसाठी पुण्यात वाहतुकीत बदल, कोणते रस्ते बंद, कुणाचा ताप वाढणार?
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी एक सविस्तर सूचना जारी केली आहे. या सूचनेच्या माध्यमातून आज पिंपरी चिंचवडमध्ये कोणकोणत्या भागात वाहतूक बदलण्यात आली, याची माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

गहुंजेमधील MCA स्टेडियमवर अरिजित सिंगचा कॉन्सर्ट

अरिजित सिंगच्या कॉन्सर्टसाठी वाहतुकीत मोठे बदल

पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीत कुठे कुटे बदल? वाचा सविस्तर...
Arijit Singh Concert Pune : प्रसिद्ध गायक अरिजित सिंगचा आज पुण्यात कॉन्सर्ट पार पडणार आहे. प्लांटोस व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर चांगलीच गर्दी होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांच्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आलेत.
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी एक सविस्तर सूचना जारी केली आहे. या सूचनेच्या माध्यमातून आज पिंपरी चिंचवडमध्ये कोणकोणत्या भागात वाहतूक बदलण्यात आली, याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या या माहितीनुसार बरेचसे रस्ते बंद करण्यात आले असून, नागरिकांना वळसा घालून जावं लागणार आहे.
मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी:
एक्सप्रेस वेवरील देहू रोड एक्झिटवरून डावीकडे वळून मामुर्डी मार्गे सर्व्हिस रोडने जावे.
किवले पुलावरून मुकाई चौकात यू-टर्न घ्यावा आणि सर्व्हिस रोडने जावे.
हे ही वाचा >> Nanded Accident Video : भरधाव स्कॉर्पिओने एकाला उडवलं, दुभाजक ओलांडून ट्रकला धडकली, दोन जागीच ठार
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहनांनी सेंट्रल चौकात यू-टर्न घ्यावा आणि साई नगर फाट्यावरून जावे.
रस्ता बंद :
जुन्या मुंबई-पुणे महामार्ग, सोमाटणे फाटा आणि मामुर्डी अंडरपासवरून येणाऱ्या वाहनांना बंदी आहे.
पुण्याहून येणाऱ्या वाहनांसाठी:
पुणे-बेंगळुरू महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी किवळे पुलावरून डावीकडे वळावे आणि सर्व्हिस रोड घ्यावा.
निगडी आणि हँगींग ब्रिजवरून येणारी वाहतूक रावेत चौक, भोंडवे चौक आणि कृष्णा चौक मार्गे वळवली जाईल.
रस्ता बंद :
गहुंजे पुलावरून वाय जंक्शनपर्यंत फक्त कार पासधारक आणि आवश्यक वाहनांना परवानगी आहे.
हे ही वाचा >> शरद पवारांनी दिल्लीतील 'तालकटोरा'मध्ये मराठा योध्यांचे पुतळे बसवण्याची मागणी का केली? इतिहास काय?
दुपारी 1 ते मध्यरात्रीपर्यंत मामुर्डी, कानेटकर बंगला आणि कृष्णा चौकाजवळ जड वाहनांना बंदी आहे.
कॉन्सर्टला येणाऱ्यांसाठी
अरिजित सिंगच्या कॉन्सर्टला येणाऱ्यांनी सूचनेत दिलेल्या दिशेनेच प्रवास करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मामुर्डी गावातील अंतर्गत रस्ते टाळण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनांनी एकाच लेनमध्ये प्रवास करावा. उशीर होऊ नये म्हणून, तुमच्या प्रवासाचं नियोजन आधीच करा असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.