Live Parasitic worm: बापरे! महिलेच्या डोक्यात सापडला जिवंत किडा, डॉक्टरही हैराण
एका 64 वर्षीय महिलेच्या डोक्यात जिवंत किडा आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या मेंदूचा एमआरआयचा रिपोर्ट काढल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. ही घटना कळताच डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय
ADVERTISEMENT
Python worm living in women brain : एका 64 वर्षीय महिलेच्या डोक्यात जिवंत किडा आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या मेंदूचा एमआरआयचा रिपोर्ट काढल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. ही घटना कळताच डॉक्टरांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय. कारण जगभरात घडलेली ही पहिलीच घटना असून त्यांच्या करिअरमधली देखील पहिलीच केस आहे. या घटनेने आता वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नेमकी संपूर्ण घटना काय आहे? हे जाणून घेऊयात. (python worm living in women brain doctors also shock australia story)
ADVERTISEMENT
गेल्या 2021 पासून महिलेवर उपचार सुरु होते. महिलेला न्युमोनिआ, पोटदूखी, जुलाब, कोरडा खोकला, ताप आणि रात्री घाम येणे अशी सर्व लक्षणे दिसत होती. त्यानुसार डॉक्टरांनी तिला स्टेरॉईड आणि इतर औषधे देऊन तिचा उपचार सुरु केला होता. या उपचारा दरम्यान 2022 ला महिलेमध्ये डिप्रेशन आणि स्मृतिभ्रंशची लक्षणेही दिसू लागली. त्यामुळे डॉक्टरांनी तिला मेंदूचे एमआरआय स्कॅन करून सर्जरीचा सल्ला दिला होता. मात्र रिपोर्टमध्ये महिलेच्या मेंदूत किडा सापडल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.
हे ही वाचा : मुंबई Tak Exclusive: DHFL चे मालक Wadhawan बंधूंचा कैदेत राजेशाही थाट, गृह खात्याला हादरवणारा रिपोर्ट
या संपूर्ण प्रकरणावर कॅनबेरा येथील संसर्गजन्य रोग विशेषज्ञ डॉ संजय सेनानायके म्हणाले, न्यूरोसर्जनने शस्त्रक्रिया केली नाही कारण त्यांना महिलेच्या डोक्यात किडा आढळून आला होता. सेनानायक यांनी यानंतर या घटनेची माहिती सर्जनला दिली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, या महिलेच्या डोक्यात काय आढळले आहे. हा एक किडा असून तो जिवंत असल्याची त्यांनी माहिती दिली होती.
हे वाचलं का?
डोक्यात 3 इंच लांबीचा किडा
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनूसार, महिलेच्या डोक्यात आढळून आलेला किडा 3 इंच लांब, चमकदार लाल रंगाचा आहे. या किड्याला पॅरासाईट राउडवॉर्म म्हणतात. तर शास्त्रज्ञांमध्ये या किड्याला ओफिडास्कॅरिस रॉबर्टसी म्हणून ओळखले जाते. ही प्रजाती सापांमध्ये आढळते. राउंडवर्मचा हा विशिष्ट प्रकार कार्पेट पायथन्स (अजरग) मध्ये आढळतो,ही एक मोठी प्रजाती आहे. हे ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनीमध्ये आढळतो.
ADVERTISEMENT
डॉक्टरही चक्रावले
अजगरामध्ये आढळणारा किडा महिलेच्या शरीरात पोहोचलाच कसा, हा विचार करून डॉक्टर देखील चक्रावले आहेत. महिलेचा सापाशी थेट संबंध नसताही घटना घडली घडली कशी असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. दरम्यान महिलेच्या घराजवळ एक तलाव आहे. या तलावात अनेक साप राहतात. या तलावाशेजारी महिला पालकची शेती करते. या पालकवर जंतांची अंडी आली असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पालक खाल्यावर ही अंडी तिच्या पोटात गेली. त्यानंतर या अंड्यातून जंत बाहेर पडला आणि महिलेच्या डोक्यात शिरल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या डोक्यातील जंतू बाहेर काढला आहे. हा जंतू बाहेर काढल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
हे ही वाचा : What is Lagrange Point: सूर्याच्या उष्णतेने Aditya-L1 भस्म होणार नाही?, ISRO च्या तज्ज्ञांची भन्नाट शक्कल!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT