Sanjay Raut : ‘शिंदे सरकारचे अंत्यसंस्कार…’, संजय राऊतांचा का चढला पारा ?
Sanjay Raut : राज्य सरकार संभाजीनगरमध्ये बैठक घेत असतानाच खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार बेकायदेशीर असून थाटामाटाची सवय लागलेल्या सरकारचे थाटामाटातच अंत्यसंस्कार करणार असल्याचे टीका संजय राऊत यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Raut : आमच्या देशाचे चार जवान अनंतनागमध्ये शहीद होतात, आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्वतःवर फुलं उधळून घेतात असा हल्लाबोल करत खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. न्यायालयाने राज्य सरकारला बेकायदेशीर ठरवले जात असताना तेच सरकार संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) बैठक घेते, त्यासाठी संभाजीनगरमधील सर्व हॉटेल बुक केली जातात या खर्चाचा हिशोब या प्रशासनाला द्यावा लागेल अशा शब्दात इशारा देत राऊतांनी सरकारसह प्रशासनालाही इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
बेकायदेशीर सरकार मराठवाड्यात येणार
राज्य सरकार छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक घेत आहे. त्या बैठकीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या बैठकीवर संजय राऊत यांनी सडकून टीका केली. न्यायालयाने बेकायदेशीर ठरवलेले सरकार मराठवाड्यात येत असले तरी ते बेकायदेशीर आहे. एकीकडे जवान शहीद होत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. तरीही या सरकारला जनतेची काळजी नाही. शिंदे-फडणवीस सरकारने या बैठकीची जय्यत तयारी केली असली तर संजय राऊत यांनी मात्र सरकारवर टीका करत बेकायदेशीरपणे स्थापन झालेले सरकार मराठवाड्यात येत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
हे ही वाचा >>…म्हणून अमित शाहांनी संभाजीनगर दौरा रद्द केला, अजित पवारांनी केला खुलासा
जरांगे पाटलांचे उपोषण संपवलं
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत उपोषण करत आहेत. मात्र त्यावर ठोस तोडगा न काढता अमित शाहा संभाजीनगर दौऱ्यावर येत असल्यामुळेच जरांगे पाटलांचे उपोषण संपवलं असल्याचा गंभीर आरोप त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.
हे वाचलं का?
शेतकऱ्यांचे आत्महत्या
गेल्या काही दिवसात मराठवाड्यातील पावणे आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तरीही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे या सरकारचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या प्रश्नांसह देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याबाबतही केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना प्रश्न विचारायचे होते, मात्र ते आले नाहीत. हे सरकार बेकायदेशीर तर आहेच मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> Nagpur News : नागपूरात साजरा होणारा मारबत उत्सव आहे तरी काय?
शासन आपल्या दारी हे रॅकेट
राज्य सरकारकडून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जोरदारपणे चालू आहे. मात्र या कार्यक्रमावरूनही संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानेच हे सरकार आपल्या माणसांना कंत्राट देऊन रॅकेट चालवत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आपल्याच माणसांना या सरकारकडून कंत्राट देऊन फक्त आपलाच फायदा करुन घ्यायचा आहे असा गंभीर आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT