Sara Tendulkar Shubman Gill : सारा-शुभमनचा व्हायरल होणारा हा फोटो खरा नाही

भागवत हिरेकर

sara tendulkar and shubman gill viral Photo : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोबद्दलची नवी माहिती समोर आलीये. हा फोटो खरा नसून, तो छेडछाड करून वापरण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

sara tendulkar and shubman gill fake photo Goes viral
sara tendulkar and shubman gill fake photo Goes viral
social share
google news

Sara Tendulkar and Shubman Gill Viral Photo : जेव्हा जेव्हा शुभमन गिलच्या रिलेशनशिपची चर्चा होते, तेव्हा सारा तेंडुलकरचं नाव येतचं. दोघेही कधी याबद्दल बोलले नाहीत, पण चर्चांच्या गॉसिपच्या विश्वात ते रिलेशनमध्ये असल्याचे दावे केले जातात. ते कधी सोबत दिसले, तर व्हिडीओही व्हायरल होतात. पण, आता सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचा एक फोटो खूपच व्हायरल होतोय. त्यामुळे त्या फोटोमागची स्टोरी काय हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. या फोटोमागची स्टोरी काय हेच समजून घेऊयात…

एक फोटो व्हायरल होतोय, ज्यात शुभमन गिलच्या खांद्यावर हात ठेवून सारा तेंडुलकर उभी असल्याचे दिसत आहे. ते एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना या फोटोने हवाच दिली. पण, हा मूळात हा फोटोच खरा नाही.

सारा तेंडुलकर शुभमन गिलच्या फोटो… प्रकरण काय?

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केलाय. हा फोटो शेअर करत यूजर्स दोघे रिलेशनमध्ये असल्याचे म्हणत आहेत. पण, हा फोटो चुकीचा आहे. सारा आणि शुभमनचा हा फोटो डीपफेक आहे.

हे ही वाचा >> “तुमची मस्ती…”, तानाजी सावंतांवर जरांगे भडकले, काय घडलं?

sara tendulkar and shubman gill deepfake photo.
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा डीपफेक फोटो.

मूळ फोटोत सारासोबत कोण?

शुभमन आणि सारा दिसत असलेल्या फोटो छेडछाड करून तयार करण्यात आला आहे. मूळ फोटोत सारासोबत तिचा भाऊ अर्जून तेंडुलकर आहे आणि साराने तिच्या इन्स्टाग्रामवर तो शेअर केला होता. साराने हा फोटो 24 सप्टेंबर रोजी शेअर केलेला आहे. या फोटोत कुणीतरी छेडछाड केली आणि अर्जूनच्या जागी शुभमनचा चेहरा लावला.

हे ही वाचा >> 20 लाखाने घेतला एकाच कुटुंबातील सात जणांचा जीव, बंद घरात काय घडलं?

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

रश्मिका मंदानाप्रमाणेच डीपेफेक

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात झारा पटेल या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर आहे. तिचा लिफ्टमधील एक व्हिडीओ आहे, ज्यात छेडछाड करण्यात आली. रश्मिका मंदानाचा चेहरा तिच्या चेहऱ्यावर लावून हा व्हिडीओ व्हायरल केला गेला. त्याचप्रमाणे आता सारा आणि शुभमनचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp