Mumbai Crime : IAS अधिकाऱ्याच्या लेकीची मुंबईत आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय?
IAS officer Vikas Rastogi : IAS कपल विकास आणि राधिका रस्तोगी यांच्या 27 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. ती वकिलीचे शिक्षण घेत होती. इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
IAS कपल विकास आणि राधिका रस्तोगी यांच्या 27 वर्षीय मुलीने केली आत्महत्या
इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली
सुसाइट नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
IAS Vikas Rastogi Daughter Suicide : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. IAS कपल विकास आणि राधिका रस्तोगी यांच्या 27 वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. ती वकिलीचे शिक्षण घेत होती. इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून तिने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
IAS विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. मंत्रालयासमोरील सुनीती नावाच्या इमारतीत ते राहतात. या इमारतीवरून उडी घेत त्यांच्या मुलीने जीवन संपवलं आहे. लिपी रस्तोगी असं या मुलीचं नाव आहे.
हेही वाचा : Vidhan Parishad Election : अजित पवारांच्या उमेदवाराविरोधातच भाजपने दिला उमेदवार!
आज (3 जून) पहाटे 4 च्या सुमारास ही घटना घडली. जेव्हा लिपीने 10 व्या मजल्यावरून उडी मारली तेव्हा ती एका बाईकवर पडली त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला. तिने एक सुसाइट नोटही लिहिली आहे.
हे वाचलं का?
27 वर्षीय लिपी रस्तोगीला घटनेनंतर तत्काळ जीटी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आज दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत तिचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हेही वाचा : सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह सापडलेल्या 'त्या' फ्लॅटमध्ये 'ही' अभिनेत्री झाली शिफ्ट!
सुसाइ़़ड नोटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
लिपी रस्तोगी अभ्यासात फार हुशार नव्हती. आई-वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही अशी भीती लिपी रस्तोगीला सतावत होती. काही दिवसांपासून ती डिप्रेशनमध्येही होती.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Exit Poll : शरद पवार 'इतक्या' जागा जिंकणार? अजित पवारांना किती? पाहा यादी
लिपीने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही. ती हरियाणातील सोनिपत येथे एल.एल.बी. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होती. मात्र, शैक्षणिक कामगिरी समाधानकारक नसल्याने ती चिंतेत होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये तिने हे सांगितलं आहे. यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात तिच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस इतर बाजूंनीही प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT