Flats In Mumbai : वांद्र्यात फक्त 1.35 लाखात 2BHK फ्लॅट, 'ती' पोस्ट का होतेय व्हायरल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

2BHK Flats In 1.35 lakh In Bandra Viral Post
2BHK Flats On Rent In Mumbai
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईत भाड्यानं फ्लॅट घ्यायचंय? मग व्हायरल झालेली पोस्ट एकदा वाचाच

point

मुंबईतील रिअल इस्टेटची मोठी अपडेट आली समोर

point

कुणा कुणाला मुंबईत राहायचंय? त्या पोस्टवर नेटकऱ्यांनी केला प्रतिक्रियांचा वर्षाव

2BHK Flat In 1.35 Lakh In Bandra Mumbai Viral Post : मुंबईत स्वत:चं घर असणं, हे अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातात बक्कळ पैसा असावा लागतो. कित्येक वर्ष काबाडकष्ट करून पैसे बचत केले, तरीही मुंबईत फ्लॅट खरेदी करताना अनेकांच्या नाकीनऊ येत. पण मुंबईत कोट्यावधी रुपयांचा फ्लॅट लाखाच्या घरात मिळत असेल, तर मग लॉटरीच लागली म्हणून समजा. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. वांद्र्याच्या पालीहील सारख्या उच्चभ्रू परिसरात 2BHK फ्लॅट अवघ्या 1.35 लाखात मिळत असल्याची एक पोस्ट इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली आहे. या व्हायरल पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण या महागड्या फ्लॅटची किंमत एव्हढी कमी का सांगण्यात आलीय, यामागचं सत्य काय आहे, हे जाणून घेऊयात.(To get home in mumbai is your dream, then you need to have lots of money, mumbai real estate latest update)

उत्कर्ष गुप्ता नावाच्या एक्स यूजरने या फ्लॅटची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिलेली रक्कम सेटलमेंटची नसून ती भाडे कराराची आहे. ग्राहकांना मुंबईतील अलिशान फ्लॅट 1.35 लाख प्रति महिना इतक्या भाडे तत्वावर मिळणार असल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
मुंबईतील फ्लॅटच्या या व्हायरल फोटोत पाहू शकता की, एक वॉशिंग मशिन कशाप्रकारे बाथरुममध्ये सेट करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Sushma Andhare: "किरीट सोमय्याचे एचडी व्हिडीओ दिसत होते, तेव्हा लोकं घरात...", सुषमा अंधारे हे काय बोलून गेल्या

टॉयलेच्या वर वॉशिंग मशिन बसवण्यात आल्याचं या फोटोत पाहू शकता. या पोस्टला एका महिन्यात 10000 लोकांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. रिअल इस्टेट वेबसाईट मॅजिकब्रिक्सनुसार (Magicbricks) या भागात 1.1 लाखापासून भाडे घेतलं जातं. ग्राहकांना या परिसरात 1.5 लाखात फ्लॅट भाड्याने मिळू शकतात. यामध्ये सेक्युरीटी डॉपिझिटचाही समावेश असतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेटकऱ्यांना हसू आवरलं नाही

हे फक्त वांद्रे येथील फ्लॅटबाबत नाही. डिपॉझीटसाठी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याचं नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून म्हटलं आहे. रिअल इस्टेटच्या वेबसाईनुसार, 1.35 लाख रुपयांमध्ये हा फ्लॅट भाड्याने मिळणार असून 4 लाख रुपये या फ्लॅटचं डिपॉझीट असणार आहे. या पोस्टची सत्यता कळताच अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय की, आमच्या मुंबईचा पराभव होऊच शकत नाही. दुसऱ्या नेटकऱ्याने मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटलंय, टॉयलेटवर बसून वाचन करणाऱ्यांना बॅकरेस्टसाठी वॉशिंग मशिन देऊ शकता. 

हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : ...पण अजित पवारांना चूक सुधारण्याची संधी आहे, सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT