Car Accident : कंटेनरने धडक दिल्याने कारचा चक्काचूर! चार जण जागीच ठार, 'ती' चूक जीवावर बेतली
Car And Truck Accident, बीड : अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
ट्रक (कंटेनर) आणि कारच्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू
'त्या' चुकीमुळं झाला भयानक अपघात
कंटेनरच्या धडकेत कारचा झाला चक्काचूर
रोहिदास हातागळे
ADVERTISEMENT
Car And Truck Accident, बीड : अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली. हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ घडला. अपघात इतका भीषण होता की, कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेले चौघेही लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहीवासी होते. मृतांची नावं अद्याप समोर आली नाहीयत. (The shocking incident of Swift car and a container near Ambajogai Latur Road near Nandgaon Pati happened on Sunday morning)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशीरा जगलपूर येथील चार जण स्विफ्ट कार मधून (एमएच 24 एएस 6334) औरंगाबादला निघाले होते. रात्री सुरू असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्ग्याजवळ कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची (एमएच 12 एमव्ही 7188) जोरदार धडक झाली. हा अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला. यावेळी कार कंटेनरच्या खाली घुसल्याने कारचा चुराडा झाला आणि चौघांचा जागीच मृत्यू झाला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Horoscope In Marathi : काय सांगता! सिंगल लोकांच्या जीवनात होणार खास व्यक्तीची एन्ट्री, पण 'त्या' राशींसाठी खतरा
हा भीषण अपघात रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय ससाणे, पीएसआय यादव, सहा.फौजदार बिडगर, हेड कॉन्स्टेबल शेख, कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
अपघाताच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू होता, त्यामुळे चालकांना समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, लातूरहून अंबाजोगाईकडे येणारा चौपदरी रस्ता बर्दापूरच्या पुढे दुपदरी करण्यात आला आहे. अचानक निमुळता झालेल्या या रस्त्याने आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी घेतले आहे. त्यामुळे हा रस्ता लोखंडी सावरगावपर्यंत चौपदरी करावा अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Raj Thackeray : ''संदीप खरंच हिरा आहे, वरळीचं व्हिजन...'', मनसेचा आदित्यविरोधात उमेदवार ठरला?
ADVERTISEMENT