Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरण: तरुणीसोबत नेमकं काय घडलं? कोर्टातील A टू Z युक्तिवाद!

मुंबई तक

Pune Rape Case : पुण्यातीस स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय.

ADVERTISEMENT

Pune Rape Case Latest News Update
Pune Rape Case Latest News Update
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरोपी दत्तात्रेय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

point

कोर्टात स्वारगेट बलात्कार प्रकरणावर काय युक्तीवाद झाला?

point

स्वारगेट बस स्थानकात नेमकं काय घडलं होतं?

Pune Rape Case : पुण्यातीस स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलीय. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टी.एस. गायगोले यांनी असे आदेश दिले आहेत. मागील दोन- तीन दिवसांपासून आरोपी गाडे फरार होता. गुरुवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पुणे पोलिसांनी आरोपी गाडेच्या शिरुर येथून मुसक्या आवळल्या आणि त्याला अटक केली. दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणात तरुणीसोबत नेमकं काय घडलं? कोर्टात दोन्ही बाजूंनी काय युक्तीवाद करण्यात आला, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. 

तपास अधिकारी नंद्रे यांनी म्हटलं की, पहाटे 5.45  वेळी वाट बघत उभ्या होत्या. ते तुम्हाला कुठे जायचं आहे? फिर्यादी यांनी सांगितले की, इथून बस जाते. मी 15 वर्ष इथे काम करतो. माझ्यावर विश्वास ठेवा. वारंवार ताई ताई म्हणत, त्याने विश्वास संपादन केला. तिच्यावर विश्वास ठेऊन आणि ते या शब्दाचा मान ठेऊन ती त्याच्या सोबत गेली. एकही प्रवासी दिसला नाही म्हणून त्या माघारी येऊ लागल्या. दादा मला खाली जायचे आहे. त्याने दरवाजा लावला आणि गळा दाबून अत्याचार केला. 

हे ही वाचा >> Namdeo Dhasal: 'कोण आहेत नामदेव ढसाळ?', सेन्सॉर बोर्डाचा उर्मटपणा.. महाराष्ट्र संतापला!

तिच्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचार केला. त्या रडू लागल्या. मूळ गावी जाणाऱ्या बस मध्ये बसल्या. आणि मित्राला फोन केला. मित्राला कॉल  केल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती द्यायला सांगितलं. त्यानुसार तक्रार दाखल झाली. समाजात तीव्र पडसाद उमटले आहेत. त्याच्या हातात मोबाईल दिसत आहे. त्याचे कपडे आणि मोबाईल जप्त करणे आहे. सर्वांगांनी वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे. अशा प्रकारचे गुन्हे त्याने केले आहेत का? यामध्ये आणखी कोणी साथीदार आहेत का? हे बघायचे आहेत. त्याला इतके दिवस कोणी सहारा दिला? याची माहिती घ्यायची आहे.हा आरोपी सराईत आहे. आतापर्यंत 6  गुन्हे आहेत. यातील जबरी चोरीचा गुन्हा आहे. एक गुन्हा वगळता त्याने सर्व गुन्हे महिलांसोबत केले आहेत. त्यामुळे त्याची 14 दिवसांची रिमांड मिळणे गरजेचे आहे. 

हे ही वाचा >> Pune: पाणी प्यायला गेला अन् पोलिसांना सापडला, नराधम दत्तात्रय गाडेच्या अटकेची Inside Story

डिफेन्स लॉयर यांनी कोर्टात युक्तीवाद केला की, ती मुलगी बस मध्ये स्वतःहून गेली आहे. CCTV मध्ये कुठेही तो तिला घेऊन गेलेला दिसत नाही. दोघांमध्ये झालेली गोष्ट एकमेकांच्या संमतीने झाले आहेत. हे बलात्काराच्या प्रकरणात येत नाही. दोघांच्या संमतीमुळे हे झाले आहे. फक्त भावनिक करण्याचा प्रयत्न आहे. माध्यमांवर वर माझा चेहरा दीसला आहे. मला रेकॉर्ड वर घेतलं तरी माझ्या एकट्याचा रोल नाही. गुन्हा सिद्ध झाला तर गुन्हा होतो. माझ्यावर गुन्हा सिद्ध झालेला नाही. मला सराईत गुन्हेगार कसे म्हणत आहेत? माझा भाऊ माझ्यासारखा दिसतो म्हणून त्याला का ताब्यात घेतलं? माध्यमामुळे आरोप होत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp