Pune Accident : भरधाव कारने जोडप्याला उडवलं, थरकाप उडवणारा व्हिडिओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

 ahmednagar kalyan highway accident car hits two wheeler husband and wife injures junnar pune story
पुण्यातील जुन्नर तालुक्यात नगर-कल्याण महामार्गावर ही अपघाताची घटना घडली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भरधाव कारने दुचाकीला भीषण धडक दिली आहे

point

दुचाकीस्वार पती-पत्नी अक्षरश हवेत उडाले होते.

point

अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

Ahmednagar kalyan Highway Accident : ओंकार वाबळे, पुणे : राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत चालल्या आहेत. पुण्यातील  पौर्शे कार अपघात प्रकरण असो किंवा वरळीतील हीट अँड रनची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेत भरधाव कारने दुचाकीला भीषण धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती दुचाकीस्वार पती-पत्नी अक्षरश हवेत उडाले होते. त्यानंतर रस्त्यावर आदळले होते. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून काळजाचा थरकार उडत आहे. (ahmednagar kalyan highway accident car hits two wheeler husband and wife injures junnar pune story) 

पुण्यातील जुन्नर तालुक्यात नगर-कल्याण महामार्गावर ही अपघाताची घटना घडली आहे. घटनास्थळी एका दुकानावर असलेल्या सीसीटीव्हीत ही अपघाताची घटना कैद झाली आहे. या घटनेत पती-पत्नी दुचाकीवरून प्रवास करत होते. या दरम्यान भरधाव कार मागून येते आणि दुचाकीला भीषण धडक देते. ही धडक इतकी भीषण असते की, दुचाकीवरील पती-पत्नी अक्षरश हवेत उडतात. त्यानंतर कारच्या टपावर आदळतात आणि रस्त्यावर दुरवर फेकले जातात. हा घटनाक्रम पाहून अनेकांच्या काळजाचा थरकाप उडालेला. 

हे ही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'बद्दल भाजपचं काय ठरलं?

सुदैवाने इतका मोठा अपघात होऊन देखील हे जोडप बचावलं आहे. त्यांना आळेफाटा येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघाताप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यानंतर धडक देणारी कार कोणाची होती आणि या कारचा मालक कोण होता? याचा तपास केला जात आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अंत्यविधीच्या गर्दीत ट्रक घुसला 

दरम्यान नगर-कल्याण महामार्गावरील गुळंचवाडी (ता.जुन्नर) येथे  अंत्यविधी उरकून काही मंडळी घरी निघाली होती. यावेळी नगरकडून येणारा भरधाव ट्रक थेट गर्दीत शिरला होता. या दरम्यान या ट्रकने अनेक चारचाकी आणि दुचाकीला धडक दिली. तरी देखील हा ट्रक थांबला नाही आणि थेट गर्दीत शिरला होता. विशेष म्हणजे जर या चारचाक्या आणि दुचाक्या समोर आल्या नसत्या तर त्याने अंत्यविधीतल्या गर्दीतल्या सर्वांना चिरूडून पळ काढला असता. 

हे ही वाचा : Neet Exam result : नीट परीक्षेचा निकाल केंद्र, शहरनिहाय जाहीर, कसा बघायचा?

दरम्यान या अपघातात चारचाक्या गाड्या आणि दुचाक्या मध्ये आल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या जखमींनी आळेफाटा आणि इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरीकांमधून रोष व्यक्त होतं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT