Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी सांगितली हल्ल्याची धक्कादायक माहिती, 'असं सात वेळा घडलंय...'

मुंबई तक

ADVERTISEMENT

political
jarange patil
social share
google news

बातम्या हायलाइट

point

माझ्यावरही हल्ल्याचा झाला होता प्रयत्न

point

सात वेळा केला होता हल्ल्याचा प्रयत्न

point

आमच्या सात गाड्या उडवल्या पण आम्ही...

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे तिसरे उपोषण सुरू झाले आहे. त्यातच आज मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर प्रतिक्रिया देत, 'त्यांना कोण कशाला मारणार, म्हाताऱ्या माणसाला मारण्याची संस्कृती महाराष्ट्राची नाही' अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे. तर त्याचवेळी आम्हालाही अशा धमक्या मिळाल्या आहेत, आणि त्या एकदा नाही तर अनेकदा मिळाल्या असल्याचे सांगत त्यांनी मी अशा धमक्यांना घाबरत नाही असंही त्यांनी सांगितले. 

सात वेळा घडलं असं

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीविषयी बोलताना सांगितले की, त्यांना कोण कशाला मारणार आहे. मात्र धमक्या फक्त त्यांनाच मिळतात असं नाही तर मलासुद्धा अशा धमक्या आल्या असून मलाही सात वेळा असंच  सांगितले आहे. पण तरीही मी घाबरत नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

वाहनं उडवली

जरांगे पाटील यांनी यावेळी साल्हेर किल्ल्यावर गेलेले असतानाचीही एक आठवण त्यांनी सांगितले की, 'मी किल्ल्यावर गेल्यावर एक अशीच घटना घडली होती, की गड्याच्या खाली वाहनं लावली होती. तर उतारावरून आलेल्या एका वाहनाने आमच्यातील पाच ते सात गाड्यांना धडक दिली होती, मात्र आम्ही घाबरलो नाही'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाहनधारकाला ताब्यात

'गडावर समाधीचं दर्शन घेतानाच पोलिसांमध्ये गडबड दिसली आणि लक्षात आले की, काही तरी घडलं असणार अशी शंका आली होती. त्यावेळी आमच्या सहा ते सात वाहनांवर दुसरं वाहन येऊन आदळलं होतें.' त्यावेळी पोलिसांनी वाहनधारकाला ताब्यात घेऊन चौकशी केली. 

आमची तक्रार नाही

ज्या वाहनाने जरांगे पाटील यांच्या आंदोलनकर्त्यांच्या वाहनांना धडक दिली होती. त्या वाहनचालकाला कुणीतरी सांगितले होते असं त्यानेच पोलिसांनाही सांगितले होते. मात्र त्याच्याबद्दल आमची काही तक्रार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT