कोण आहेत IPS भाग्यश्री नवटक्के, CBI का धडकली थेट त्यांच्या दारी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्केंविरुद्धच्या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती
महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्केंविरुद्धच्या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेशी संबंधीत 1200 कोटींचा घोटाळा

point

आयपीएस भाग्यश्री नवटक्केंवर गुन्हा

point

IPS भाग्यश्री नवटक्केंवर नेमके काय काय आरोप?

IPS Bhagyashree Navatake: मुंबई: भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेशी संबंधित घोटाळा प्रकरणात IPS अधिकारी भाग्यश्री नवटक्के आता CBI च्या निशाण्यावर आल्या आहेत.  सीबीआयने भाग्यश्री नवटक्के यांच्याविरोधात FIR नोंदवला असून, लवकरच त्यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे. (cbi takes over probe of case against maharashtra cadre ips officer bhagyashree navatake bhaichand hirachand raisoni credit institution scam)

IPS भाग्यश्री नवटक्के यांच्या विरोधात ऑगस्ट महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. नवटक्के यांनी 2020-21 दरम्यान जळगावच्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेशी संबंधीत 1200 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी केली होती. मात्र, आता त्या प्रकरणातील आरोपींनी केलेल्या तक्रारीनंतर भाग्यश्री नवटक्के या स्वत:च या प्रकरणात अडकल्या आहेत.

हे ही वाचा>> Digital Scam: बँक खात्यात पैसे नाही तरी तुमच्या लाखो रुपयांवर डल्ला, काय आहे हे नवं Scam?

सरकारने याप्रकरणी 2024 मध्ये सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणात आता भाग्यश्री नवटक्के यांच्याविरोधात IPC च्या कलम 34, 120 बी, 166, 167, 177, 193, 201, 203, 219, 220, 466, 474 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नेमके आरोप काय? 

प्रकरणांच्या चौकशीसाठी प्रचलित असलेल्या कार्यपद्धतींचं पालन न करता भाग्यश्री नवटक्के यांनी काही प्रकरण हेतूपुरस्कररित्या आपल्याकडे घेतले. याव्यतिरिक्त पुणे आणि आसपासच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करणे, चुकीच्या पद्धतीने गुन्हे नोंदवण्यासाठी दबाव टाकणे, ठराविक लोकांना आरोपी बनवणे, प्रकरणात जाणीवपूर्वक हवा भरणे, गंभीर पुराव्यांकडे दुर्लक्ष करणे, आरोपपत्रांमध्ये फेरफार करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

हे ही वाचा>> Bigg Boss 18 : डंके की चोट पे...गुणरत्न सदावर्ते पुन्हा बिग बॉसमध्ये परतणार?

भाग्यश्री नवटक्के यापूर्वीही सापडल्या होत्या वादात 

भाग्यश्री नवटक्के यांनी पुण्याच्या गुन्हे शाखेच्या उपायुक्त राहिल्या आहेत. यादरम्यानच त्यांनी हे गैरकृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांनी बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये कार्यकरत असताना दलित बांधवांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही त्या वादात सापडल्या होत्या. 

ADVERTISEMENT

त्यानंतर त्यांची बदली औरंगाबादला करण्यात आली होती. सध्या त्या चंद्रपूरमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या अक्षीक्षक म्हणून कार्यरत आहेत. एकूणच या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT