Video : पेट्रोल पंपाच्या रांगेत अचानक कोसळले, शिक्षकाला कसं गाठलं मृत्यूनं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

 beed teacher heart attack cctv footage petrol pump incident shocking story
हल्ली हदयविकाराचा झटका कुणाला येईल याचा काही नाही नेम नाही आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा मृत्यू

point

हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू

point

या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Beed News : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हद्यविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (beed teacher heart attack cctv footage petrol pump incident shocking story) 

ADVERTISEMENT

हल्ली हदयविकाराचा झटका कुणाला येईल याचा काही नाही नेम नाही आहे. याआधी पन्नाशी पार केलेल्यांना हदयविकाराचे झटके यायचे. मात्र आता धडधाकड तीशीतल्या तरुणांना सुद्धा हदयविकाराचे झटके येत आहेत. आता बीडमध्ये पेट्रोल पंपावर एका व्यक्तीला हदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे. पेट्रोल भरण्यासाठी हा व्यक्ती रांगेत असताना अचानक तो खाली कोसळला होता. यामध्ये या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

हे ही वाचा : Navi Mumbai Crime : धक्कादायक! छातीवर, गृप्तांगावर गंभीर जखमा करून संपवलं, 22 वर्षीय तरुणीची कुणी केली क्रूर हत्या?

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील नगर रस्त्यावरील पोलिस पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. मृत व्यक्ती हे शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. बाबासाहेब मिसाळ असे त्यांचे नाव आहे. पेट्रोल भरण्यासाठी ते आले अन् काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे. पेट्रोल पंपावरील इतर लोकांना काही समजण्याआधीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता स्कुटीवर पेट्रोल भरण्यासाठी ते रांगेत उभे असल्याचे दिसून येत आहे. इतक्यातच ते गाडीवरून खाली कोसळतात. आजूबाजूचे लोक त्यांची गाडी उचलून बाजूला करतात. शिवाय त्यांना मिर्गीचा दौरा असल्याचे समजून चप्पलेचा वास देत असल्याचे दिसून येत आहे.पेट्रोल पंपावर उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर काही काळ पंपावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.'

हे ही वाचा : Supriya Sule : ''बाबांपेक्षा बाळासाहेबांनीच माझ्या लग्नात...'', सुप्रिया सुळेंनी सांगितला किस्सा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT