Ganpat Gaikwad : “ज्यांना गद्दारी करून…”, भाजप आमदाराचे श्रीकांत शिंदेंच्या वर्मावर बोट

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

political wars in Ganpat Gaikwad and Shrikant Shinde.
political wars in Ganpat Gaikwad and Shrikant Shinde.
social share
google news

Ganpat Gaikwad Shrikant Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजप आमदाराने थेट गद्दार म्हटले. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना राजकीय संघर्ष वाढला आहे. (Ganpat Gaikwad vs Shrikant Shinde)

ADVERTISEMENT

दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण आणि भिवंडी लोकसभेत भाजपचा उमेदवार उभा राहील आणि निवडून येईल, असे विधान केले होते. त्याला उत्तर देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणालेले की, “जो पर्यंत असे वक्तव्य करणार नाही, तोपर्यंत प्रसिद्धी मिळणार नाही. यांचे वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतलं पाहिजे”, असे टोला गायकवाड यांना लगावला होता.

भाजप आमदाराचे श्रीकांत शिंदेंना प्रत्युत्तर

आता पुन्हा आमदार गणपत गायकवाड यांनी ट्विट करत नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहेत. “ज्यांना गद्दारी करून कमी वेळात अमाप पैसा आणि सत्तेचे बळ मिळाले आहे. त्यांना त्यांच्या नजरेने सर्वजण विदूषक आहेत असा भास होतो”, असे प्रत्युत्तर आमदार गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांना दिले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

श्रीकांत शिंदे-गणपत गायकवाडांमध्ये ठिणगी कशी पडली?

चार राज्यांच्या निकालानंतर कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी आमदार गायकवाड म्हणाले होते की, “येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि भिवंडी या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येणार.” गायकवाड यांनी एका प्रकारे शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले होते.

हेही वाचा >> गोळ्या घालून केली चाळण, कोण होते सुखदेव सिंह गोगामेडी?

खासदार श्रीकांत शिंदे यांना जेव्हा यासंदर्भात प्रश्न विचारला गेला, त्यावेळी ते म्हणाले की, “कोण कुठून कुठला उमेदवार उभा राहील यासाठी वरिष्ठ सक्षम आहेत. जोपर्यंत असे वक्तव्य करणार नाही, तोपर्यंत प्रसिद्धी मिळणार नाही. यांचे वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतला पाहिजे. या आधीही खूप वक्तव्य झाली, त्यावर काही लोकांना माघारही घ्यावी लागली”, अशा शब्दात त्यांनी डिवचलं होतं.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “पंकजाताई आणि मी मिळून…”, धनंजय मुंडेंचं मोठं विधान

“आम्ही याच्यावर जास्त लक्ष न देता पाहणी दौरा व काम करतोय. कुणी टीका केली, त्याच्यावरती टीका करायला एवढा वेळ माझ्याकडे नाही. लोकांनी दिलेला वेळ लोकांसाठी वापरला पाहिजे आणि मी ते करतोय. त्यांच्याकडे काही सांगायला किंवा बोलायला नसेल, त्यांना हे सगळे उद्योग असतात. मात्र मला काम आहे”, असे श्रीकांत शिंदे म्हणालेले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT