Chandrayaan -3 : चंद्रयान मोहिमेचा तुम्हा-आम्हाला काय फायदा होणार?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chandrayaaan 3 landing moon lunar discover all you need to know what was profit for common man
chandrayaaan 3 landing moon lunar discover all you need to know what was profit for common man
social share
google news

Chandrayaan Moon landing : भारताच्या चंद्रयान 3 (chandrayaan 3) या यानाने यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केली आहे. अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश आहे. हा क्षण भारतासह देशवासियांसाठी ऐतिहासिक आहे. त्यामुळे भारताच्या या ऐतिहासिक यशाचा देशभरात जल्लोष करण्यात येत आहे. दरम्यान असे असताना चंद्रयान 3 मोहिमेचा तुम्हा-आम्हाला काय फायदा होणार आहे, हे जाणून घेऊयात. (chandrayaan 3 landing moon lunar discover all you need to know what was profit for common man)

ADVERTISEMENT

वैज्ञानिकांना मोठा फायदा

चंद्रयान 3 ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले आहे. आता लँडरमधून रोव्हर बाहेर पडणार आहे. त्यानंतर लँडर आणि रोव्हर हे दोघेही चंद्रावरील वातावरण, पृष्ठभाग, रसायने, भूकंप इत्यादी गोष्टीचा शोध घेणार आहेत. चंद्रावरील या संशोधनाचा इस्रोसह जगभरातीस वैज्ञानिकांना भविष्यातील अभ्यासासाठी फायदा होणार आहे. तसेच वैज्ञानिकांना संशोधन करण्यास सोप्पे जाणार आहे.

हे ही वाचा : Chandrayaan 3 : ज्यांच्या मार्गदर्शनामुळे भारताने इतिहास रचला ते एस सोमनाथ कोण आहेत?

देशासाठी किती महत्वाची गोष्ट

चंद्रयानच्या या यशाचा देशाला खूप मोठा फायदा आहे. कारण या मोहिमेमुळे भारत अशा देशांच्या पक्तीत जाऊन बसतो, जे देश खूप शक्तिशाली आहेत आणि अशा मोहिमेत नेहमीच मोठं यश मिळवतात. आता चंद्रयानच्या सॉफ्ट लँडिंगमुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर चंद्रावर पाऊल ठेवणारा चौथा देश आहे. कारण भारताआधी अमेरीका, रशिया आणि चीन या देशांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ISRO ला काय फायदा होणार?

जगभऱात सर्वात स्वस्त कमर्शियल लाँचिंगसाठी इस्त्रो ओळखले जाते. आतापर्यंत 34 देशांच्या 424 सॅटेलाईट लाँच करण्यात आल्या आहेत. भारताच्या चांद्रयान 1 या मोहिमेने चंद्रावर पाण्याचा शोध लावला होता. तर चांद्रयान 2 चे ऑर्बिटर आजही चंद्रावर आहे आणि ते काम करतेय. आता चांद्रयान 3 दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँड झाला आहे. त्यामुळे आता चंद्रावरून तो कोणकोणती महत्वपुर्ण माहिती पुरवतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा : Exclusive: Chandrayaan-3 Vikram लँडरने नुकतेच पाठवले चंद्राचे नवे फोटो!

मानवासाठी किती महत्वाची मोहिम?

चंद्रयान आणि मंगलयान या स्पेसक्राफ्टवर लावण्यात आलेल्या पेलोड्स म्हणजेच उपकरणांचा पुढे हवामान आणि दळणवळणासाठी वापर होतो. सरंक्षण संबंधित आणि नकाशा बनवण्यासाठी देखील या उपग्रहाचा वापर होतो. या यंत्राद्वारे सर्वसामान्य नागरीकांसाठी फायद्याची कामे होत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT