Chandrayaan 3 : लँडर-रोव्हर चंद्राच्या कुशीत झोपणार, चांद्रयान 3 मोहिमेचं काय होणार?
चांद्रयान 3 मोहिमेत प्रज्ञान रोव्हरने आता त्याचे संशोधन पुर्ण केले आहे. या संशोधनानंतर एक-दोन दिवसात चंद्रावर रात्र होणार आहे. त्यामुळे चंद्रमोहिमेला विराम देऊन प्रज्ञान रोव्हरला आणि विक्रम लँडरला स्लिप मोडवर ठेवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
Chandrayaan 3 Sleep mode: चांद्रयान 3 मोहिमेत प्रज्ञान रोव्हरने आता त्याचे संशोधन पुर्ण केले आहे. या संशोधनानंतर एक-दोन दिवसात चंद्रावर रात्र होणार आहे. त्यामुळे चंद्रमोहिमेला विराम देऊन प्रज्ञान रोव्हरला आणि विक्रम लँडरला स्लिप मोडवर ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती इस्त्रोने सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. त्यामुळे आता चंद्रयान 3 मोहिमेचा काय होणार? ही मोहिम पुन्हा कधी सुरु होणार? असा सवाल सामन्य नागरीकांना पडला आहे. (chandrayaan 3 vikram lander and pragyan rover sleep mode isro chief somnath)
ADVERTISEMENT
इस्त्रोने एक्स प्लॅटफॉर्मवरून चांद्रयान मोहिमेत प्रज्ञान रोव्हरने आपले काम पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. यानंतर आता आता प्रज्ञान रोव्हरला सुरक्षित ठिकाणी पार्क करून स्लीप मोडवर ठेवले आहे.इस्रोने साधारण विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला 14-15 दिवस झोपायला ठेवले आहे. तसेच सध्या या यानावर लावण्यात आलेले APXS आणि LIBS पेलोड बंद करण्यात आले आहेत. या पेलोड्सच्या मदतीनेच लँडरद्वारे डेटा पृथ्वीवर पाठविला जातो.
हे ही वाचा :Rohini Khadse : मुक्ताईनगरचा MVA चा उमेदवार ठरला! रोहित पवारांनी केली मोठी घोषणा
‘सध्या बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे. रिसीव्हर चालू ठेवला आहे. असाइनमेंटचा दुसरा संच पूर्ण करण्यासाठी रोव्हर पुन्हा एकदा जागे होण्याची अपेक्षा आहे. तसे झाले नाही, तर तो भारताचा चंद्रदूत म्हणून चंद्रावर उपस्थित असेल, असे देखील इस्त्रोने सांगितले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Chandrayaan-3 Mission:
The Rover completed its assignments.It is now safely parked and set into Sleep mode.
APXS and LIBS payloads are turned off.
Data from these payloads is transmitted to the Earth via the Lander.Currently, the battery is fully charged.
The solar panel is…— ISRO (@isro) September 2, 2023
…म्हणून स्लिप मोडवर
येत्या 5-6 सप्टेंबरपासून चंद्रावर अंधार पसरणार आहे. या अंधारानंतर चंद्रावर साधारण 14 ते 15 दिवसांनी सुर्यप्रकाश पडणार आहे. त्यामुळे या दरम्यान चंद्रावर रात्र असल्याने मोहिमेतही अडचणी येणार नाही. यासोबतच चंद्रावर सुर्यप्रकाश देखील न पडल्याने उपकरणे देखील चार्ज होणार नाही आहेत. त्यामुळे पुढील सर्यप्रकाश होईपर्यंत प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला स्लिप मोडवर ठेवले आहे.
ADVERTISEMENT
गेल्या 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6.04 वाजता चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरवण्यात आले होते. त्यावेळेस चंद्रावर सूर्य उगवला होता. त्यामुळे इस्रोची अशी योजना होती की, चंद्राच्या ज्या भागात लँडर-रोव्हर उतरेल त्या भागाला पुढील 14-15 दिवस सूर्यप्रकाश मिळेल. म्हणजे तिथे अजून दिवस आहे. जे फक्त पुढचे चार-पाच दिवस टिकेल. त्यानंतर अंधार पडायला सुरुवात होईल. त्यामुळे आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला स्लीप मोडवर ठेवले आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा :parliament special session 2023 : “मोदीजी आहेत, काहीतरी मोठं घडेल”
दरम्यान आता पुढच्या 22 सप्टेंबर 2O23 ला लँडर आणि रोव्हर झोपेतून जागे होणार आहे. जर ते यशस्वीरीत्या जागे झाले तर दुसऱ्या असायमेंटला सुरूवात होणार आहे.जर तो जागा झाला नाही तर तो भारताचा चंद्र राजदूत म्हणून कायमचा तिथेच राहणार आहे.
.
ADVERTISEMENT