‘मला मुख्यमंत्री करा, एका चुटकीत…’, संभाजीराजे छत्रपतींचं विधान चर्चेत
कोल्हापूर येथे विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण सुरू आहे. सारथी फेलोशिप सरसकट देण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. या विद्यार्थ्यांशी बोलताना संभाजीराजे छत्रपतींनी हे विधान केलं.
ADVERTISEMENT
Chhatrapati Sambhaji Raje : राज्यसभेचे माजी खासदार आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या एका विधानाची जोरात चर्चा सुरूये. मला मुख्यमंत्री करा, तुमचा प्रश्न चुटकीत सोडवतो, असं विधान छत्रपती संभाजीराजेंनी कोल्हापुरात केलं.
ADVERTISEMENT
राज्यात 1,312 विद्यार्थ्यांना सारथीकडून महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात फेलोशिप मिळत होती. महायुतीचे सरकार आल्यानंतर अवघ्या 200 संशोधक विध्यार्थ्यांना सीईटी परीक्षेद्वारे फेलोशिप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याला विद्यार्थ्यांकडून विरोध होत आहे.
हे ही वाचा >> ‘शरद पवारांच्या गाडीत…’, कीर्तिकरांनी सांगितला कदमांच्या गद्दारीचा इतिहास
पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी, फेलोशिप विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून मिळावी, संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी, या मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील संशोधक विद्यार्थी साखळी उपोषण करत आहेत. या विद्यार्थ्यांच्या उपोषणास्थळी जाऊन माजी खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली.
हे वाचलं का?
सारथीच्या संचालकांनी संभाजीराजेंनी काय दिलं उत्तर?
मागण्यांसंदर्भात राजर्षी शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव संसाधन विकास संस्था अर्थात सारथीचे संचालक अशोक काकडे यांच्याशी संभाजीराजेंनी मोबाईलवरून संपर्क साधला. मात्र काकडे यांनी हा धोरणात्मक निर्णय असून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करावी लागेल, असं सांगितलं.
ADVERTISEMENT
त्यानंतर उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी संभाजीराजेंना आम्हाला न्याय मिळवून द्या अशी विनंती केली. तुम्हीच यातून मार्ग काढा, आम्ही तात्काळ उपोषण मागं घेतो, अशी विनंती केली. त्यावर संभाजीराजे छत्रपती विद्यार्थ्यांना म्हणाले की, मला मुख्यमंत्री करा, मी हा प्रश्न चुटकीत सोडवतो, असं विधान संभाजीराजेंनी केलं. ते ऐकून विद्यार्थीही आवाक् झाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ‘चूक तुमची आहे, कायदा…’, जरांगे पाटील फडणवीसांना स्पष्टच बोलले
लवकरच मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा
एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा विषय गंभीर होत चालला असताना दुसरीकडे मराठा संशोधक विद्यार्थी आपल्या मागण्यांसाठी 13 दिवसांपासून उपोषण करताहेत. दिवाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT