Nitin Gadkari: ‘विष खरेदी करायला पैसै आहेत का पाहा’, गडकरी भर सभेत हे काय बोलून गेले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

do you have money to buy poison union minister nitin gadkari got angry due to bad roads of washim
do you have money to buy poison union minister nitin gadkari got angry due to bad roads of washim
social share
google news

Nitin Gadkari Road: जका खान, वाशिम: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या बेधडकपणा आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. आपल्या खात्याशी संबंधित आणि विशेषत: रस्ते बांधणीच्या कामाबाबत ते खूपच सजग असतात त्यामध्ये झालेली हयगय त्यांना अजिबात चालत नाही हे आपल्याला वारंवार पाहायला मिळालं आहे. मात्र, आता तर त्यांनी खराब रस्त्यावरुन थेट भर सभेतूनच नेते आणि पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. ते वाशिममध्ये (Washim) एका कार्यक्रमासाठी आले होते. (do you have money to buy poison union minister nitin gadkari got angry due to bad roads of washim)

ADVERTISEMENT

‘मी गुणवत्तेशी तडजोड नाही करणार. चांगली कामं झाली पाहिजे, आता मी पाहिला रस्ता.. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर.. असा घाणेरडा रस्ता होता की, बस्स… इकडे-तिकडे लोकं पाहत होते, मला वाटलं की लोकं माझ्याकडे पाहत आहेत. तर ते माझ्याकडे पाहत नव्हते तर ते खड्ड्यात पाय पडतोय का ते पाहत होते. म्हणून मागे-पुढे पाहत होते. मला पाटनी म्हणाले नगरपरिषदमध्ये पैसेच नाहीत. थोडं विष खरेदी करायला पैसे आहेत का पाहून घ्या..’ असं थेट नितीन गडकरी यांनी वाशिमच्या सभेतून जनप्रतिनिधींना ऐकवलं आहे.

हे ही वाचा>> Kiran Samant : उदय सामंतांच्या भावाच्या स्टेट्सला ठाकरेंची मशाल, कारण काय?

नेमकं काय-काय म्हणाले नितीन गडकरी?

ठेकेदारांना त्रास देऊ नका.. मी वाशिम जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व अधिकाऱ्यांना विनंती करतो, मी ठेकेदारावर दबाव टाकून काम मार्गी लावेन, पण कृपया ठेकेदाराला त्रास देऊ नका. पण जर रस्ता खचला तर बुलडोझरने तो पाडून टाकेन. अशी तंबीही गडकरींनी सर्व कंत्राटदारांना यावेळी दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मी कोणताही दिखाऊपणा केलेला नाही. आत्तापर्यंत मी 50 लाख कोटी रुपयांची कामे दिली आहेत पण एकाही कंत्राटदाराला कंत्राट मिळविण्यासाठी माझ्या घरी येण्याची गरज पडलेली नाही.

हे ही वाचा>> उत्तर दिलं नाही म्हणून विद्यार्थ्यासोबत असं काही केलं की शिक्षिकेला झाली अटक

पाटनी कमर्शियल कॉम्प्लेक्स, रिसोड मार्ग, वाशिम येथे आयोजित कार्यक्रमात तीन टप्प्यात पूर्ण झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 चे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज आले होते. 3694 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 133.85 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर नितीन गडकरी बोलत होते. पण त्यावेळी त्यांनी वाशिममधील खराब रस्त्यांवरून बरीच टीका केली. ज्याची आता सोशल मीडियावर खूप जोरदार चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT