भयंकर! 3 वर्षाच्या चिमुकल्याच्या डोळ्यात किडा घुसला, ऑपरेशननंतर डॉक्टरही चक्रावले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

doctor removed worm alive from 3 year boy shivpuri madhya pradesh
doctor removed worm alive from 3 year boy shivpuri madhya pradesh
social share
google news

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) शिवपूरी (Shivpuri) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने डॉक्टरांना देखील चक्रावून सोडले आहे. त्याचं झालं असं की डॉक्टरांकडे एक 3 वर्षीय चिमुकला उपचारासाठी आला होता. या चिमुकल्याच्या डोळ्यात किडा घुसला होता. डॉक्टरांनी (Doctor) या मुलावर 15 मिनिटात उपचार करून हा किडा बाहेर काढला होता. विशेष म्हणजे हा किडा डोळ्यातून बाहेर काढल्यानंतर जिवंत होता, त्यामुळे ही घटना पाहून डॉक्टर देखील चक्रावले आहेत. या घटनेची चर्चा आता गावात सूरु आहे.(doctor removed worm alive from 3 year boy eyes bye treatment shocking story shivpuri madhya pradesh)

ADVERTISEMENT

शिवपूरी जिल्ह्यातील बसई गावात ही घटना घडली आहे. या गावात वीरेंद्र आदिवासी त्याच्या कुटुंबियासोबत राहतो. या वीरेंद्रला कुलदीप नावाचा एक 3 वर्षाचा मुलगा आहे. त्या दिवशी रात्री कुलदीप घरी खेळत असताना त्याच्या डोळ्यात अचानक किडा घुसला होता. डोळ्यात किडा घुसल्याची कुटुबियांना काहीच कल्पना नव्हती. पण कुलदीपच्या डोळ्यात किडा शिरल्यामुळे तो जोरजोरात रडत होता. मुलाचे हे रडणे पाहून आई-वडिलांनी त्याला स्थानिक जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते.

हे ही वाचा : युट्यूबवर व्हिडिओ पाहून घरीच डिलिव्हरी…,बायकोसोबत घडली भयंकर घटना

यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. गिरीश चतुर्वेदी यांनी कुलदीपच्या डोळ्याची तपासणी केली. यावेळी डॉक्टरांना कुलदीपच्या डोळ्यात किडा शिरल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर ड़ॉक्टरांनी कुलदीपच्या डोळ्याचे ऑपरेशन केले.15 मिनिटात डॉक्टरांनी हे ऑपरेशन पुर्ण केले आणि त्याच्या डोळ्यातून किडा बाहेर काढला. डॉक्टरांनी ज्यावेळेस हा किडा बाहेर काढला, त्यावेळी तो जिवंत होता. त्यामुळे हा प्रकार पाहून डॉक्टरांनी देखील आश्चर्च व्यक्त केले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या प्रकरणावर बोलताना डॉ. गिरीश चतुर्वेदी म्हणाले की, डोळ्यातील अश्रू नलिकाजवळ छिद्र पाडून हा किडा डोळ्यात शिरला होता. या किड्याने चिमुकल्याच्या डोळ्यांच्या नसांना कुरतडले होते, ज्यामुळे डोळ्यात जखमा झाल्या होत्या. तसेच हा किडा चिमुकल्याच्या डोळ्यात छिद्र पाडण्याचा प्रयत्न करत होता. ज्यामुळे डोळ्यातूनही रक्त देखील येत होते, अशी माहिती चतुर्वेदी यांनी दिली.

दरम्यान हा किडा डोळ्यातून बाहेर काढण्यासाठी एक छोटस ऑपरेशन करावं लागणार होते. त्यानुसार डॉक्टरांनी हे ऑपरेशन केले आणि डोळ्यातून किडा बाहेर काढला होता. हा किडा ऑपरेशन नंतर जिवंत बाहेर काढण्यात आला होता. त्यामुळे किंडा जिवंत असल्याचे पाहून डॉक्टरांनी देखील चक्रावले होते. या घटनेनंतर माझ्या डॉक्टरकीच्या कारकिर्दीत अशी पहिली घटना घडल्याचे गिरीश चतुर्वेदी यांनी सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Bacchu Kadu : ‘…तर युतीला राम राम’, कडूंनी वाढवलं शिंदे-फडणवीसांचं टेन्शन

आता 3 वर्षाच्या कुलदीपची किड्यापासून मुक्तता झाली आहे. ऑपरेशननंतर डॉक्टरांनी त्याला काही गोळ्या देखील दिल्या आहेत. या गोळ्यांनी त्याचे डोळे बरे होणार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT