Mhada Lottery 2024: मुंबईतील घराचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून मोठी लॉटरी जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

म्हाडाकडून मोठी लॉटरी जाहीर
म्हाडाकडून मोठी लॉटरी जाहीर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

म्हाडा लॉटरी पद्धतीने तब्बल 2030 घरांची विक्री

point

विविध उत्पन्न गटातील २०३० घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर

point

सोडतीची जाहिरात https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर होणार प्रसिद्ध

Mumbai Mhada Lottery 2024: मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (Mhada)मुंबईतील घरांसाठी मोठी सोडत जाहीर केली आहे. म्हाडा लॉटरी पद्धतीने तब्बल 2030 घरांची विक्री करणार आहे. ही सगळी घरं मुंबईतील असणार आहेत. विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल- वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स - मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० घरांच्या विक्रीसाठी नुकतीच सोडत जाहीर करण्यात आली आहे. (dream of a house in mumbai will come true big lottery has been announced by mhada for sale of 2030 flat)

ADVERTISEMENT

म्हाडाच्या घरांसाठी कधी करता येणार ऑनलाइन अर्ज?

म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 9 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरूवात होईल. या सोडतीची जाहिरात 8 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार असून घरांच्या सोडतीबाबत माहिती देणारी पुस्तिका देखील वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

हे ही वाचा>> Gold Price Today : सोने झाले आणखी स्वस्त! 10 ग्रॅम किती रुपयात?

अर्ज सादर करण्याची आणि अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख कोणती?

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत 4 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्वीकारण्याची तारीख 4 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत असणार आहे.

हे वाचलं का?

म्हाडाच्या 2030 घरांसाठी कोणत्या तारखेला जाहीर होणार लॉटरी?

सोडतीसाठी प्राप्त अर्जाची यादी  9 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ही 11 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत केली जाणार आहे. तसेच प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत ही 13 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. तसेच सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर केले जाईल.

कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरं?

मुंबई मंडळाच्या सन 2024 च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) 359 घरं अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) 627 घरं, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) 768 घरं, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) 276 घरं विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> LPG Price: बजेटनंतर गॅस सिलिंडरच्या दरात मोठा बदल; जाणून घ्या किती रूपयांनी वाढली किंमत?

या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या 1327 घरांसाठी, विकास नियंत्रण नियमावली 33 (5), 33 (7) आणि 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त 370 घरं (नवीन व मागील सोडतीतील घरं) व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या 333 घरांचाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

मोबाइल App ही उपलब्ध

म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहिती पुस्तिका, व्हिडीओ आणि हेल्प फाईल या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेबाबत जाणून घ्यावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्या उत्पन्न गटासाठी किती उत्पन्न मर्यादा?

1. अत्यल्प उत्पन्न गट: या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये 6 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. 

2. अल्प उत्पन्न गट: अल्प उत्पन्न गटासाठी रुपये 9 लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. 

3. मध्यम उत्पन्न गट: मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. 

4. उच्च उत्पन्न गट: उच्च उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. 

अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

घराच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास/फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT