Ganesh Chaturthi 2024: मोदकांव्यतिरिक्त गणेश चतुर्थीला बनवा 'हे' झटपट बनणारे 5 गोड पदार्थ!
Ganesh Chaturthi 2024 Sweetes : यंदा गणेश चतुर्थीचा सण 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता आहे. पूजेच्या वेळी तुम्ही गणपतीचे आवडते मोदक बनवून त्यांना अर्पण करू शकता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
यंदा गणेश चतुर्थीचा सण 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे.
गणेश चतुर्थीला बाप्पाची पूजा केली जाते आणि विविध प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात
बाप्पाला मोदकांव्यतिरिक्त हे गोड पदार्थ नैवैद्याला झटपट बनवा
Ganesh Chaturthi 2024 Sweetes : यंदा गणेश चतुर्थीचा सण 7 सप्टेंबर 2024 रोजी आहे. बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच आतुरता आहे. डेकोरेशनपासून ते बाप्पाच्या नैवेद्यापर्यंत... कसं आणि काय बनवायचं याची तयारी लोक महिन्याभरापासूनच करायला सुरूवात करतात. अशावेळी आज आपण बाप्पाला मोदकांव्यतिरिक्त कोणते गोड पदार्थ नैवैद्याला झटपट बनवू शकतो याविषयी जाणून घेऊयात. (Ganesh Chaturthi 2024 make these sweetes at home for ganesh chaturthi)
ADVERTISEMENT
गणेश चतुर्थीला बाप्पाची पूजा केली जाते आणि विविध प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात. पूजेच्या वेळी तुम्ही गणपतीचे आवडते मोदक बनवून त्यांना अर्पण करू शकता. याशिवाय जर तुम्हाला चतुर्थीला घरी झटपट वेगवेगळी मिठाई बनवायची असेल तर तुम्ही हे 5 गोड पदार्थ बनवू शकता.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' महिलांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार लाभ, बँकेत 4500 जमा होणार ?
गुलाब जामुन
भारतीय असो किंवा परदेशी गुलाब जामुन हा सर्वांच्याच आवडीचा गोड पदार्थ आहे. काहींना तर ते खूपच आवडतात. साखरेच्या पाकातले स्पॉन्जी, रसाळ आणि अत्यंत चविष्ट गुलाब जामुन खव्यापासून तयार केले जातात. ते घरी झटपट तयार करता येतात.
हे वाचलं का?
जलेबी
गोड आणि कुरकुरीत जलेबी खूप चविष्ट लागते. जलेबी घरी बनवण्यासाठी बेसनचे आंबवलेले द्रावण वापरले जाते. तुम्ही घरीही सहज जिलेबी बनवू शकता.
हेही वाचा : Ladki Bahin Yojana Aadhar Link: पैसे मिळाले नाही तर करा 'या' गोष्टी, लगेच मिळतील 3000 रु.
फ्रूट कस्टर्ड
तुम्हाला बाप्पाला फ्रूट कस्टर्डही अर्पण करता येईल. ते बनवण्यासाठी दुधात कस्टर्ड पावडर मिसळली जाते. जेव्हा दूध उकळल्यानंतर घट्ट होते तेव्हा ते थंड करून त्यात भरपूर फळं कापून टाकली जातात.
ADVERTISEMENT
श्रीखंड
श्रीखंड अतिशय चवदार आणि लोकप्रिय गोड पदार्थ आहे. भारतीय लोकांना हा पदार्थ खूप आवडतो. दुधात आटवून त्यात केशर, साखर आणि वेलची घालून तुम्ही मस्त श्रीखंड तयार करू शकता.
ADVERTISEMENT
खीर
तुम्ही बाप्पाला कोणत्याही प्रकारची खीर देऊ शकता. तांदूळ आणि मखनाची खीर चवीला उत्तम असते, म्हणून तुम्ही ती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार करू शकता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT