Trumpet Symbol : पवारांसाठी गुड न्यूज! ‘तुतारी’ चिन्हाबाबत निवडणूक आयोग प्रचंड मोठा निर्णय!
Good News for Sharad Pawar : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत Trumpet चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा फटका बसला होता. अनेकांना ट्रम्पेट आणि तुतारी यांच्यातील फरक समजला नसल्याने मोठा घोळ झाला होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लोकसभा निवडणुकीत Trumpet चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा फटका
निवडणूक आयोगाकडून नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आल्या?
ट्रम्पेटचे मराठी भाषांतर तुतारी न करता ट्रम्पेट ठेवण्याची सूचना
NCP SP Election Commission on Trumpet : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत Trumpet चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठा फटका बसला होता. अनेकांना ट्रम्पेट आणि तुतारी यांच्यातील फरक समजला नसल्याने मोठा घोळ झाला होता. सातारा लोकसभेची जागाही यामुळे हातातून निसटल्याचं बोललं गेलं. पण आता याबाबत निवडणुक आयोगाने एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. इंग्रजी वाद्य ट्रम्पेट आणि मराठी वाद्य तुतारी यांच्यात फरक असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सांगितलं होतं. आता निवडणूक आयोगाने या निवडणूक चिन्हाबाबत प्रचंड मोठा निर्णय घेतला आहे. (good news for sharad pawar ncp before vidhan sabha election now trumpet marathi translation will be trumpet not tutari)
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणुकीत मुक्त चिन्हाचे वाटप करत असतांना ट्रम्पेटचे मराठी भाषांतर तुतारी न करता ट्रम्पेट ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत."Trumpet" या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरीत नाव तुतारी ऐवजी 'ट्रम्पेट'च राहील अशी सूचना निवडणूक आयोगाने दिली आहे.
हेही वाचा : Mumbai Tak Chavdi: 'अमित ठाकरे मुख्यमंत्री...?', मनसेचे 6 नगरसेवक फोडण्यावर वरुण सरदेसाई स्पष्टच बोलले
निवडणूक आयोगाकडून नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आल्या?
Election Commision Directions:भारत निवडणूक आयोगाने दिनांक 26 मार्च, 2024 रोजी निर्गमित केलेल्या मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्य स्तरीय पक्षांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यासाठीच्या राज्यस्तरीय पक्षांच्या यादीमध्ये "नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार" या पक्षाचा समावेश केला असून सदर पक्षाला "Man Blowing Turha" हे चिन्ह वाटप केलेले आहे. सदर चिन्हांचे मराठी भाषांतर या कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या निवडणूक चिन्हांच्या तक्त्यामध्ये "तुतारी वाजविणारा माणूस" असे नमूद करण्यात आलेले आहे. दोन्ही चिन्हांमध्ये असलेल्या तुतारी या नाम सार्धम्यामुळे/समान उच्चारामुळे (Phonetic overlap) प्रचारा दरम्यान मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात येतो, सबब, मुक्त चिन्ह असलेल्या "Trumpet" या चिन्हांचे मराठी भाषांतर तुतारी असे वापरण्यात येऊ नये अशी विनंती नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या पक्षाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे केली होती, ही विनंती निवडणूक आयोगाकडून मान्य करण्यात आली आहे.
हे वाचलं का?
वस्तुस्थिती विचारात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीमधील "Trumpet" या मुक्त चिन्हाचे मराठी भाषांतरण "तुतारी" ऐवजी "ट्रम्पेट" असे सुधारित करण्यात येत आहे. यासंदर्भातील सुधारित निवडणूक चिन्हांचा तक्त्ता PDF मंध्ये आपणास उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तरी, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संदर्भातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करतेवळी व अन्य आवश्यक प्रयोजनासाठी सुधारीत तक्त्यामध्ये नमूद केल्यानुसार "Trumpet" या मुक्त चिन्हाचे मराठी नाव "तुतारी ऐवजी "ट्रम्पेट" असे दर्शविण्यात यावे.
हेही वाचा : Baramati: लोकसभेच्या शेवटच्या दिवसाचा बदला पवारांनी पहिल्याच दिवशी बारामतीत घेतला...
Symbol Signs:चिन्हाचे मराठी भाषांतरण करण्यासाठी तुतारी, पिपाणी, बिगुल याप्रमाणे अनेक समानार्थी शब्द उपलब्ध आहेत. मात्र यापैकी कोणताही एक शब्द वापरल्यास आणखी संभ्रामवस्था निर्माण होऊ शकते. याबाबत असेही नमूद करण्यात येते की, निवडणूक चिन्हांच्या तक्त्यातील काही निवडणूक चिन्हांना इंग्रजी नावाप्रमाणे मराठी नाव दर्शविण्यात आले आहे. उदा. एअर कंडिशनर, ऑटो रिक्शा, बॅट, बॅटरी टॉर्च, ब्रेड टोस्टर, ब्रश, ब्रीफकेस, केक, कॅलक्युलेटर, कॅमेरा, लॅपटॉप, हेडफोन, हेलमेट, टेबल इत्यादी, असंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT