Gold Price Today 1st November 2024: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे भाव खरंच गडगडले? पाहा आजचे 24 कॅरेटचे दर...

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gold Price Today 01 November 2024 in Maharashtra : आज (01 नोव्हेंबर 2024) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदीचा विचार करताय? मग, तुमच्यासाठी ही बातमी खास आहे. सणासुदीच्या दिवसात सोन्याला प्रचंड झळाळी आली आहे. यावेळी सोन्याने नवा उच्चांक गाठला. अशा परिस्थिती आता ऐन दिवाळीत सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पण आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे दर थोडेफार गडगडले आहेत. चला तर मग सोने-चांदीच्या किंमतीतील हे बदल सविस्तर जाणून घेऊयात. (Gold-Silver prices down today 1st november 2024 on diwali laxmi puja festival what are the rates of 24 22 and 18 carat gold)

भारतात सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. पण आज थोडं का होईना यामध्ये बदल झाला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.

हेही वाचा : Trumpet Symbol : पवारांसाठी गुड न्यूज! ‘तुतारी’ चिन्हाबाबत निवडणूक आयोग प्रचंड मोठा निर्णय!

Goodreturns वेबसाईटनुसार, गुरूवारी (31 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 81,330 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 770 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 80,560 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 74,550 रूपये होता. त्यातही 700 रूपयांनी घट झाली असून त्याची किंमत 73,850 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 97,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती आहे. 

हेही वाचा : Maharashtra Weather : सोसाट्याचा वारा, वादळी पाऊस... राज्यातील 'या' भागांना आज IMD चा इशारा!

तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?

Mumbai Gold Price Today:

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,850 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,560 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,420 रूपये आहे.

Latest Gold Rate in Pune:

ADVERTISEMENT

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,850 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,560 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,420 रूपये आहे.

Nagpur Gold Rate:

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,850 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,560 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,420 रूपये आहे.

Nasik latest Gold Price:

  • 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 73,880 रूपये आहे.
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,590 रूपये आहे. 
  • 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 60,450 रूपये आहे.

22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?

सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.

22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT