Gold Price: मोठ्या मोठ्यांची झाली दैना पण, सोन्याचा भाव काही खाली येईना! पाहा 1 तोळ्याच्या किंमती...
Gold-Silver Rate Today : सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या भावात दिवसेंदिवस विक्रमी वाढ होताना दिसत आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडलेले दिसत आहेत. अलीकडच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीची चमक वाढलीये.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या भावात दिवसेंदिवस विक्रमी वाढ
नवरात्री सुरु होणार असल्याने सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
Gold-Silver Rate Today : सणासुदीच्या दिवसांत सोन्याच्या भावात दिवसेंदिवस विक्रमी वाढ होताना दिसत आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडलेले दिसत आहेत. अलीकडच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीची चमक वाढलीये. त्याचबरोबर आता नवरात्री सुरु होणार असल्याने सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. सोनं पहिल्यांदाच 77 हजारांच्या वर गेलं आहे. चला तर मग आजच्या (28 सप्टेंबर 2024) सोने-चांदीच्या किंमतींमधील बदल जाणून घेऊयात. (Gold-Silver rate hike 22 24 18 carat today 28 september 2024 in maharashtra mumbai Pune nashik what are the prices know it)
ADVERTISEMENT
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी (28 सप्टेंबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,450 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 50 रूपयांनी घट झाली असून याची किंमत 77,400 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,000 रूपये होता. जो 50 रूपयांनी घसरला असून त्याची किंमत 70,950 रूपये झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 95,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
हे वाचलं का?
सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली आहे.
हेही वाचा : Flats In Mumbai : वांद्र्यात फक्त 1.35 लाखात 2BHK फ्लॅट, 'ती' पोस्ट का होतेय व्हायरल?
तुमच्या शहरात सोन्याचा भाव काय?
मुंबई
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,400 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रूपये आहे.
पुणे
ADVERTISEMENT
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,400 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,400 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,050 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,980 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,430 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 58,130 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : BB Marathi 5: “तांबोळी तुला सोडून येणार आंबोली”, बिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री! निक्की करणार बाईईई...
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT