Gunaratna Sadavarte : “संघाची पिलावळ… भाजपचा हात”, काँग्रेस नेत्याचा थेट ‘वार’
गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांवर टीका केली. नथुराम गोडसेचे कौतुक करत महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान केले. यावरून विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली.
ADVERTISEMENT
Gunaratna Sadavarte Latest News : गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद उमटले आहेत. नथुरामचा उदोउदो करत गुणरत्न सदावर्ते बरळले. सदावर्तेंनी काँग्रेसलाही लक्ष्य केले. त्यानंतर आता काँग्रेस थेट भाजपला घेरलं आहे.(Gunaratna Sadavarte controversy : Criticised Mahatma Gandhi, Sharad Pawar and praises Nathuram Godse)
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट गुणरत्न सदावर्ते यांना संघाची पिलावळ असं संबोधत भाजपला काही सवाल केले आहेत.
भाजपला सवाल, विजय वडेट्टीवारांची मागणी काय?
“गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेवर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी. राज्यात महायुती सरकार आल्यापासून देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उद्दातीकरण सुरू आहे. सदावर्ते सारखी संघाची पिलावळ महात्मा गांधी यांचा अपमान करत आहे तरी त्याच्यावर कारवाई का होत नाही?”, असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> छगन भुजबळांनी शरद पवारांना कसं केलं ब्लॅकमेल, माजी आमदारांने सांगितला किस्सा
“स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालवर नथुराम गोडसेचा फोटो छापण्याची हिंमत यांची झालीच कशी ? सत्ताधारी भाजपचा हात असल्याशिवाय ही पिलावळ अशी गरळ ओकू शकत नाहीत आणि इतका माज करू शकत नाही. आजच्या घडीला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी बँक भाजपच्या आशीर्वादाचे धनी असलेल्या सदावर्ते सारख्या भ्रष्टाचाऱ्यामुळे अडचणीत आली आहे”, असे टीकास्त्र वडेट्टीवारांनी सदावर्तेंवर डागलं.
सदावर्ते शरद पवारांबरोबच काँग्रेसबद्दल काय बोलले?
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा शरद पवारांना लक्ष्य केले. यवतमाळमध्ये झालेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सभेत त्यांनी काही विधानं केली. ते म्हणाले, “शरद पवार यांचे बगलबच्चे तांदळा एवढ्या खड्याइतके होते. गोंधळ वगैरे काही करू शकले नाहीत. तोंडातून शब्दही बाहेर पडले नाहीत. अत्यंत घाणेरडी कृती आहे. संदीप शिंदेंना (महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष) धडा शिकवण्याची गरज आहे. ज्या अहवालावर प्रभू राम चंद्रांचा फोटो, हिंदू राष्ट्रभारत लिहिलेला आहे, त्या अहवालावर हात लावण्याचा प्रयत्न केला आणि तिथून झोडपून बाहेर काढलेलं आहे.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> वसुंधरा राजेंना भाजपने शोधला पर्याय! कोण आहेत महाराणी दिया कुमारी?
गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्तेवर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी.
राज्यात महायुती सरकार आल्यापासून देशाच्या राष्ट्रपित्याची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उद्दातीकरण सुरू आहे.
सदावर्ते सारखी संघाची पिलावळ महात्मा गांधी यांचा अपमान करत आहे तरी त्याच्यावर कारवाई का होत… pic.twitter.com/M6ji91Og5S
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 29, 2023
ADVERTISEMENT
सदावर्ते पुढे म्हणाले की, “शरद पवार यांच्या विचारांना जसं झोडपून बाहेर काढलं, तसं त्यांच्या बगलबचच्च्यांनाही झोडपून बाहेर काढलं. नथूराम गोडसेंची अखंड भारताची भूमिका आजही हिंदूस्थानींच्या काळजात आहे. कुणालाही भारताचे तुकडे पसंत नाहीत. गांधींजींचा विचार आता काहीच शिल्लक राहिलेला नाही. अखंड भारताचा विचार शिल्लक आहे. पाकिस्तान दिल्याचा विषय शिल्लक नाही. नथुरामांचे विचार काँग्रेसी विचार संपवू शकत नाहीत. थातूर मातूर तुटक्या मुटक्या विचारांचे अजिबात संपवू शकत नाहीत. शरद पवारांचा विचार नथूराम गोडसेच्या पायाच्या धुळीइतकाही नाही, असं माझं स्पष्ट मत आहे”, असे सदावर्ते म्हणालेले.
ADVERTISEMENT