नाशिकजवळ भीषण अपघात, 200 फूट खोल दरीत बस कोसळून 7 जणांचा मृत्यू
Nashik-Surat NH Bus Accident: नाशिक-सुरत महामार्गावरील सापुतारा घाटात एका खाजगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, 15 जणांची प्रकृती खूपच गंभीर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

नाशिक-गुजरात महामार्गावर बस दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू

या अपघातात इतर 15 जण गंभीर जखमी झाले

अपघाताच्या कारणाचा तपास सुरू
नाशिक: नाशिक-सुरत महामार्गावरील सापुतारा घाटात आज (2 फेब्रुवारी) सकाळी एक भीषण अपघात झाला. 50 भाविकांना घेऊन जाणारी एक खाजगी लक्झरी बस तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की बस कोसळताच तिचे अक्षरश: तुकडे झाले. (horrible road accident on nashik surat highway bus fell into a 200 feet deep ditch 7 people died on the spot)
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांनी भरलेली ही बस कुंभमेळ्याहून येत होती आणि गुजरातमधील धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी जात होती. दरम्यान, सापुतारा येथील मालेगाव घाटाजवळ हा अपघात झाला.
हे ही वाचा>> Udit Narayan : लाईव्ह कॉन्सर्टमध्ये उदित नारायण यांनी तरुणीला केलं 'KISS', Video पाहून नेटकरी संतापले अन्...
सकाळी साडेपाचच्या सुमारास नाशिक-सुरत महामार्गावरील सापुतारा घाटाजवळ एक खाजगी बस अनियंत्रित झाली आणि 200 फूट खोल दरीत कोसळली. बस अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी जखमींना मदत करण्यासाठी तातडीने धाव घेतली. तसेच पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अपघातात बळी पडलेले सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील आहेत. कुंभमेळ्यानंतर ते नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात आले होते. यानंतर ते देव दर्शनासाठी गुजरातला जात होते.
द्वारकेला जात होती बस
अपघाताच्या वेळी बस नाशिकमधील त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारकेला जात होती. दरम्यान, बसमध्ये प्रवास करणारे भाविक मध्य प्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस गुजरातमधील द्वारकेला जात असताना हा दुर्दैवी अपघात झाला.
हे ही वाचा>> GB Syndrome: महाराष्ट्राची चिंता वाढली, GBS मुळे 5 जणांचा मृत्यू, पुण्यात सर्वाधिक रुग्ण
या भाविकांचा एक गट 23 डिसेंबर रोजी धार्मिक यात्रेसाठी निघाला होता. तो उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील विविध तीर्थस्थळांना भेट देत होता. यात्रेकरू चार बसमधून प्रवास करत होते, त्यापैकी एका बसला अपघात झाला आहे.