Viral Video News : सेल्फीचा नाद पडला भारी! पुण्यातील तरुणी कोसळली दरीत, व्हिडीओ बघा
Satara selfie Accident Video : सातारा जिल्ह्यातील बोरणे घाटात सेल्फीच्या नादात तरुणी खोल दरीत कोसळली. त्या तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सातारा जिल्ह्यातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल
सेल्फी घेताना तरुणी कोसळली दरीत
साताऱ्यातील बोरणे घाटामध्ये घडली घटना
Satara Video News : (इम्तियाज मुजावर, सातारा) साताऱ्यातील बोरणे घाटात एक भयंकर घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद घेताना जीव धोक्यात घालू नका, असे आवाहन वारंवार केलं जात असताना एका तरुणीने नको, ते धाडस केलं अन् आयुष्यभराची अद्दल घडली. पुण्यातील तरुणी काही जणांसोबत फिरायला गेली पण, बोरणे घाटात भयंकर घटना घडली. सेल्फी घेण्याच्या नादात ही तरुणी खोल दरीत पडली. (29 year old girl fell straight into valley in satara)
ADVERTISEMENT
पुण्यातील वारजे येथील 29 वर्षीय नसरीन अमीर कुरेशी ही तरुणी ग्रुपसोबत पावसाळी पर्यटनासाठी सातारा जिल्ह्यात आली होती. संगमनगरमध्ये ते कारने आले होते. सर्वजण ठोसेघर येथे फिरले.
धबधबा होता बंद, बोरणे घाटात आले अन्...
ठोसेघर येथे सगळेजण धबधबा बघण्यासाठी आले होते. मुसळधार पाऊस आणि गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्घटनांमुळे ठोसेघर धबधबा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नसरीन ग्रुपसोबत बोरणे घाटात आले. माघारी येताना बोरणे घाटातील एका कठड्यावर सायंकाळी ६ च्या सुमारास सेल्फी काढण्यासाठी नसरीन व तिचे मित्र थांबले. तिथे सगळे फोटो काढत होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Sindhudurg : 'त्या' अमेरिकन महिलेबाबत खळबळजनक माहिती समोर
नसरीन खोल दरीत कोसळली
बोरणे घाटात नसरीन कुरेशी सेल्फी काढत होती. निसरड्या ठिकाणी काठावर जाऊन सेल्फी घेत असताना तिचा तोल गेला आणि ती खोल दरीत कोसळली. सुदैवाने खाली ती एक झाडाला अडकली.
पोलीस आणि ट्रेकर्संनी काढले बाहेर
नसरीन कुरेशी दरीत कोसळल्यानंतर तिच्यासोबत असलेले सगळे घाबरून गेले. त्यातील काही जणांनी याची माहिती पोलिसांना दिली. सातारा पोलिसांनी शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्संच्या तरुणांना बोलावून घेतले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> "कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, कारण..."; आंबेडकरांचा ओबीसींना इशारा
पोलीस ट्रेकर्स आणि होमगार्डच्या मदतीने नसरीनपर्यंत पोहोचले. होमगार्ड अभिजित मांडवे यांनी दरीत उतरून नसरीनला दोरीच्या साहाय्याने वर आणले. नसरीन कुरेश या घटनेत गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला बाहेर काढत असताना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यटन स्थळे, धबधबे बंद
सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी होत असल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी २ ते ४ ऑगस्टपर्यंत पर्यटनस्थळे व धबधबे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी काही अतिउत्साही पर्यटक मात्र आपला जीव धोक्यात घालून पर्यटनासाठी व धबधब्याकडे जात आहेत.
ADVERTISEMENT