Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल, पैसे मिळणार की नाही?

विद्या

ADVERTISEMENT

ladaki bahin yojana petition against scheme bombay high court big decision eknath shinde mukhymantri majhi ladki bahin yojana maharashtra
शिंदे सरकार आणि महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिकेवर सूनावणी पडली पार

point

कोर्टाने योजनेविरोधातील याचिका फेटाळली

point

शिंदे सरकार आणि महिलांना मोठा दिलासा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यसरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया देखील सूरू आहे. असे असतानाच या लाडकी बहीण योजनेला (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) कोर्टात आव्हान देण्याल आले होते. त्यामुळे महिलांना मिळणाऱ्या पहिल्या हफ्त्याला ब्रेक लागणार होता. आता या याचिकेवर कोर्टाने काय निकाल दिला.महिलांच्या खात्यात पहिला हफ्ता जमा होणार आहे का? हे जाणून घेऊयात. (ladaki bahin yojana petition against scheme bombay high court big decision eknath shinde mukhymantri majhi ladki bahin yojana maharashtra) 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून महिलांना देण्यात येणाऱ्या पहिल्या हफ्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयात कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही, असे कोर्टाने याचिका फेटाळताना म्हटले आहे. त्यामुळे शिंदे सरकार आणि महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

हे ही वाचा : Malegaon : मासे पकडायला गेले अन् मृत्युनेच दिला वेढा, गिरणा नदीत रात्रभर...

नवी मुंबईतील नावेद मुल्ला नामक चार्टड अकाऊंट यांनी वकील ओवैस पेचकर यांच्या मार्फत याचिका दाखल केली होती.या याचिकेमार्फत लाडकी बहीण योजनेला कोर्टान आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे महिलांना पहिला हफ्ता मिळणार की नाही? यावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र आता कोर्टाने महिलांना दिलासा देत लाडकी बहीण योजनेविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे. सरकारच्या धोरणात्मक निर्णयात कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही, असे कोर्टाने याचिका फेटाळताना म्हटले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Vidhan Sabha election : ठाकरेंचा पुण्यावर डोळा! विधानसभेसाठी प्लॅन काय?

नावेद मुल्ला यांनी आपल्या याचिकेद्वारे लाडकी बहीण योजनेमुळे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप केला होता. पण कोर्टाने त्यांचा आरोपही फेटाळून लावला. कर भरतो म्हणून सुविधा द्या अशी मागणी करता येत नाही. विशेषतः तुम्हाला वाटले म्हणून अशा पद्धतीने सर्वसामान्यांच्या हिताचा मुद्दे करत सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला आव्हान देता येत नाही, असे कोर्टाने या प्रकरणी याचिकाकर्त्याचे कान टोचताना म्हटले आहे. 

खात्यात पैसै कधी जमा होणार? 

राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT