Maharashtra Weather Updates : बारामतीत सर्वात कमी तापमानाची नोंद, राज्यात आज कुठे-किती तापमान?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Weather Updates :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा जोर कायम आहे.  थंडीची ही लाट अनेक भागांमध्ये पसरली असून, राज्यातील काही ठिकाणी किमान तापमान 10 च्या खाली घसरल्याचं दिसलं आहे.  भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी ही माहिती दिली. पुण्यातील बारामतीमध्ये 7.8 अंश सेल्सिअस, तर पुणे व नाशिक जिल्ह्यांत 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Apps Ban in India : भारत सरकारने 'या' 14 Applications वर बंदी का घातली, काय होतं कारण? समोर आली धक्कादायक माहिती

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तापमानाच्या आकड्यांवर नजर टाकल्यास, जळगावात पारा 8.3 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला, तर परभणीमध्ये 9.4 डिग्री, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 डिग्री आणि आणि धाराशिवमध्ये पारा 10.2 अंश सेल्सिअसवर आलेला आलेला पाहायला मिळाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये 9.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्याची राजधानी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत किमान तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं, तर कुलाबा (दक्षिण मुंबई) येथे 20 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.

दरम्यान, शेजारी तेलंगणामध्येही तापमान कमालीचं घसरलेलं पाहायला मिळालं. हैदराबादसह  अनेक भागांमध्ये थंडीची लाट आली आहे. आदिलाबाद शहरात तर पारा 5.3 अंशांवर घसरला आहे.

हे वाचलं का?

आज कुठे  किती तापमान?


छत्रपती संभाजीनगर : 12°
कोल्हापूर : 26°
महाबळेश्वर : 20.2°
मुंबई : 22°
पुणे : 10.2°
परभणी : 25.8°
मालेगाव, नाशिक : 24°
अहमदनगर : 25.2°
जेऊर, सोलापूर : 29°
नांदेड : 24°

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT