Maharashtra Bhushan : 14 श्री सदस्यांच्या मृत्यूचं कारण आलं अखेर समोर
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मृत्यु झालेल्या व्यक्ती 6 ते 7 तासांपासून उपाशी होत्या. त्यातील काहींनी अनेक तासांपासून अन्नाबरोबर पाणीही पिलेलं नव्हतं, असं आता पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या श्री सदस्यांपैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारच्या मोठ्या कार्यक्रमात 14 लोकांच्या मृत्यूने सरकार टीकेचे धनी ठरले असून, श्री सदस्यांचे मृत्यू नेमके कशामुळे झाले? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. आता या प्रकरणातील माहिती समोर आली असून, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून मृत्यूच्या कारणाचा खुलासा झाला आहे.
ADVERTISEMENT
‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाने खारघर येथील कार्यक्रमानंतर मृत्यू झालेल्या 14 श्री सदस्यांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्ट संदर्भातील वृत्त दिलं आहे.
आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताने मृत्यू झालेल्या 14 पैकी 12 जणांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यात आले. 12 मृतदेह पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. सोमवारी या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार 12 मृत व्यक्तीची पोटं रिकामी होती. त्यातील दोन जणांनी अन्नाबरोबर पाणीही पिलं होतं की नाही, हे स्पष्ट कळू शकलं नाही.
हा कार्यक्रम 16 एप्रिल रोजी सकाळी 10.30 ते 1.15 या वेळेत झाला आणि 21 लाख श्री सदस्य (आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी) उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी असलेल्या वैद्यकीय बूथच्या माहितीप्रमाणे या कार्यक्रमा-दरम्यान जवळपास 650 जणांना उष्माघातामुळे त्रास झाला. त्याचबरोबर प्रकृती गंभीर झाल्याने जवळपास 60 जणांनी जवळच्या रुग्णालयात धाव घेतली. त्यापैकी 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. 10 श्री सदस्य अजून वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असून, 36 जणांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली.
ADVERTISEMENT
मृत्यू झालेले श्री सदस्य 6 ते 7 तास होते उपाशी
1) रिपोर्टनुसार मृत्यू झालेले श्री सदस्यांची पोटं रिकामी होती. मृत्यू होण्याआधी त्यांनी 6 ते 7 तासांपासून काही खाल्लेल नव्हतं. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेच्या जास्त वेळ संपर्कात राहिल्याने त्यांच्या शरीरात पाण्याची नसल्याचं दिसून आलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘आमच्या पोटात काही नव्हतं’; जखमींनी अजित पवार, उद्धव ठाकरेंना काय सांगितलं?
२) त्यापैकी काही श्री सदस्यांना सहव्याधी होत्या (comorbidities). त्यांनी अनेक तासांपासून काहीच अन्न खाल्लेल नव्हतं. त्याचबरोबर त्यांनी पुरेसं पाणीही प्राशन केलेलं नव्हतं. अशात ते 40 अंश सेल्सिअस तापमान असताना उन्हात होते.
3) हायपरटेन्शन किंवा ह्रदयाचा त्रास असलेल्या व्यक्तीला मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो, हे समजून सांगताना डॉक्टरांनी माहिती दिली की, मृतांपैकी एका व्यक्तीला ह्रदयविकाराचा त्रास होता. त्याबरोबर मधुमेह आणि हायपरटेन्शन असलेल्या व्यक्तींची प्रकृतीही अशा वातावरणात पटकन बिघडते.
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींची ‘श्री समर्थ बैठक’ म्हणजे काय.. लाखो श्रीसेवक त्यांना का मानतात?
4) सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी दीर्घकाळ उन्हाच्या संपर्कात राहायचं असल्यास थोड्या थोड्या अंतराने काहीतरी खाल्ल पाहिजे आणि पाणी प्यायला हवं. जे लोक चार ते पाच तास उन्हात बसलेले आहेत, केवळ पाणी पिल्याने त्यांना उष्माघाताचा त्रास टाळता येत नाही. शेडमुळे अशी घटना टाळता येऊ शकते, असंही डॉक्टरांनी सांगितलं.
ADVERTISEMENT