पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये उष्णतेच्या लाटा पसरणार! 'या' जिल्ह्यांत पावसाचं होणार आगमन, जाणून घ्या आजचं हवामान
Maharashtra Weather Today : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या झळा पसरत असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज्यात कोणत्या जिल्ह्यात पसरणार उष्णतेच्या लाटा?

कोणत्या जिल्ह्यात पडणार धो धो पाऊस?

जाणून घ्या महाराष्ट्रातील आजचं हवामान
Maharashtra Weather Today : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या झळा पसरत असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही कोसळत आहेत. पण राज्यातील काही भाग असा आहे, जिथे कोरडं हवामानाची स्थिती आहे. काल सोमवारी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये कोरड्या हवामानाच अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु, आजच्या हवामानाची स्थिती बदललेली आहे. आज राज्यातील कोणत्या जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान, कोणत्या भागात पाऊस पडणार आहे? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, छत्रपती संभाजी नगर, जालना, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्ध्यात उष्ण व दमट हवामान असणार आहे. या भागत उष्णतेच्या लाटा पसरणार असून उकाडा वाढणार आहे.
हे ही वाचा >> कामाची बातमी: तुमच्याकडे देखील नाही जन्माचा दाखला? या '5' टिप्सचा वापरा अन् मिळवा Birth Certificate
तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, परभणी, बीड, हिंगोलीमध्ये कोरडं हवामानाची स्थिती असणार आहे. कोल्हापूर घाट परिसर, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळसाठी हवामान विभागाने कोणताही इशारा दिलेला नाही.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने काल सोमवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये हलक्या व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती. तर छत्रपती संभाजी नगर, जालना,बीड, अकोला, नागपूरमध्ये उष्ण व दमट हवामानाचा अंदाज बांधण्यात आला होता.