Maharashtra Politics : भाकरी फिरवली! भगीरथ भालके सोडणार शरद पवारांची साथ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Maharashtra Latest news : bhagirath bhalke may be quit ncp and join KC Rao BRS party.
Maharashtra Latest news : bhagirath bhalke may be quit ncp and join KC Rao BRS party.
social share
google news

Maharashtra latest political news Marathi : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय मागे घेतल्यापासून शरद पवार (Sharad Pawar News) पक्ष विस्ताराच्या तयारीला लागले आहेत. वेगवेगळ्या भागाचे दौरे शरद पवार करत असून, राजीनामा मागे घेतल्यानंतरच्या पहिल्या सोलापूर दौऱ्यात शरद पवारांनी पंढरपूर मतदारसंघात भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला होता. पण, त्यामुळे भगीरथ भालके अस्वस्थ झाले. त्यातच आता भालके राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा जारोत सुरू झाली आहे. (Maharashtra latest political news today)

ADVERTISEMENT

Latest news on Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजीनामा नाट्यावर पडदा पडल्यानंतर मे महिन्यात शरद पवार सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी पंढरपुरातील कार्यक्रमात शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा >> Abhijeet Patil : शरद पवारांनी पंढरपुरात ‘भाकरी’ फिरवली, ‘मविआ’चा उमेदवार ठरला!

याच कार्यक्रमात शरद पवारांनी अभिजीत पाटील हे महाविकास आघाडीचे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असतील अशी घोषणाही करून टाकली. अभिजीत पाटलांच्या नावाची घोषणा केल्यानं भगीरथ भालके अस्वस्थ झाले. कारण 2024 ची विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या भालकेंचा पत्ताच कट झाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भगीरथ भालके के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसच्या वाटेवर?

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पक्षाचं पारडं जड करण्यासाठी शरद पवारांनी अभिजीत पाटील यांना पक्षात घेतलं. पण, आता भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालकेचं राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करण्याची चर्चा सुरू झाली आहे. भालकेंनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली तर तो पक्षासाठी मोठा धक्का असेल असंही स्थानिक पातळीवर बोललं जात आहे.

अभिजीत पाटील यांना पक्षात सामावून घेत शरद पवारांनी त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अस्वस्थ असलेले भगीरथ भालके तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे.

ADVERTISEMENT

विधानसभा – 2024 : भगीरथ भालके काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बोलताना भगीरथ भालके म्हणाले, “2024 ची निवडणूक मी लढवणार हे निश्चित आहे. आम्ही निष्ठा, प्रेम ठेवून काम करणारी माणसं आहोत. पक्ष सत्तेत असो वा नसो आम्ही पक्षाने घालून दिलेली चौकट पाळून काम करणारे कार्यकर्ते आहोत. पण यापुढे लोक सांगतील त्या पद्धतीने माझी भूमिका असणार आहे.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “आ गए गद्दार”, शरद पवार शिंदेंवर बरसले, मोदींवरही चढवला हल्ला!

भगीरथ भालके यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याला दुजोरा दिला आहे. पंढरपूरमधून अभिजीत पाटील निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. दुसरीकडे भगीरथ भालकेंनीही विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. लोक हेच माझा पक्ष आहे, असं म्हणत भालके यांनी त्यांच्या मनातील इच्छा बोलून दाखवली आहे.

पंढरपूर मतदारसंघात भारत भालके यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. भारत भालके यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. तेव्हा एक लाख पाच हजार मतं त्यांना मिळाली होती. भालके यांना मानणारी मोठी संख्या पंढरपुरची आहे. त्यामुळे भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडली, तर राष्ट्रवादीसाठी पंढरपुरात हा मोठा धक्का असेल आणि याचा फायदा विरोधकांना होईल, अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT