Rain Update: रात्र वैऱ्याची... पहाटे 'या' धरणातून आणखी वेगाने सोडणार पाणी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

पहाटे 'या' धरणातून आणखी वेगाने सोडणार पाणी!
पहाटे 'या' धरणातून आणखी वेगाने सोडणार पाणी!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोयना धरणातून प्रतिसेकंद 21 हजार 50 क्युसेक पाणी सोडले

point

सातारा, सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

point

पहाटे 3 वाजता पुन्हा वाढणार पाण्याचा वेग

कराड: महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यापासून धरणाचे सहा वक्री दरवाजे 1 फूट 6 इंच उचलून प्रतिसेकंद 10 हजार क्युसेक पाण्याचा कोयना नदीत विसर्ग सुरू करण्यात आला होता. जो आता 20 हजार क्युसेक एवढ्या वेगाने सोडण्यात येत आहे. तर आज पहाटे 3 वाजता त्याचा वेग अधिक वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (rain update at 3 am water will be released from koyna dam at a faster rate alert issued to villages)

ADVERTISEMENT

मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरण व्यवस्थापनाने सायंकाळी सात वाजल्यापासून हा विसर्ग वाढवत प्रतिसेकंद 20 हजार क्युसेक पाणी कोयना नदीत सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता नदीचं पात्र अधिक विस्तारलं आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Rain: पावसाचा धुमाकूळ, कोणत्या धरणातून किती सोडलं पाणी?

मागील तीन दिवसांपासून पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 1 हजार 50 क्युसेक पाणी कोयना नदीत सोडले जात होते. त्यामुळे सायंकाळी सात वाजल्यापासून कोयना नदीत प्रतिसेकंद 21 हजार 50 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून सातारा व सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

पहाटे 3 वाजता पाण्याचा वेग वाढणार

कोयनेतून सध्या 20,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, तो पहाटे 3 वाजता 30,000 क्युसेक इतका होईल. सकाळी 9 वाजता तो 40,000 क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे. 

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती 

राज्यात अनेक भागात मोठा पाऊस असल्याने काही धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. याबाबतीत मी सातत्याने सिंचन विभागाशी संपर्कात असून, सिंचन अधिकाऱ्यांना स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

1) खडकवासलातून 35,300 क्युसेक इतका विसर्ग होत होता. तो आता 40,000 क्युसेक इतका विसर्ग होत आहे. उद्या सकाळी पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. याची संपूर्ण माहिती पुणे महापालिकेला सातत्याने देण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Viral Video: पत्नी, मुलीशी बोलला अन्... इंजिनिअरने थेट अटल सेतूवरून मारली समुद्रात उडी

2) कोयनेतून सध्या 20,000 क्युसेक इतका विसर्ग सुरु असून, तो पहाटे 3 वाजता 30,000 क्युसेक इतका होईल. सकाळी 9 वाजता तो 40,000 क्युसेक इतका होण्याची शक्यता आहे. सिंचन विभागात सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहे.

3) महाराष्ट्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारशी संपर्कात आहे. कर्नाटकचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि अलमट्टी धरणाचे मुख्य अभियंता यांच्याशी सातत्याने संवाद होतो आहे. 517.5 मीटर इतकी पाणीपातळी (एफआरएल) कायम ठेवण्यास सांगण्यात आले आहे आणि ते कर्नाटक सरकारने मान्य केले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT