Maharashtra Weather forecast : पुणेकरांनो, काळजी घ्या! महाराष्ट्र 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई तक

Maharashtra weather Latest update : भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवला असून, सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्र आणि मुंबईला हवामान विभागाकडून रेड अलर्ट.
भारतीय हवामान विभागाने पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. मुंबईत अतिमुसळधार पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा

point

पुण्यासह चार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाज

point

मुंबई, ठाण्यासह विदर्भातील तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

IMD Alert for Maharashtra, Mumbai, Pune, Kolhapur : मागील 24 तासांपासून महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने धुमाकूळ घातला असून, पुढील काही तास धोक्याचे असणार आहे. त्यामुळे काही काम असेल, तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. (The Indian Meteorological Department has issued a red alert for the districts of Pune, Satara, Ratnagiri and Sindhudurg. IMD has predicted that there will be extremely heavy rainfall in Mumbai)

मान्सून सक्रिय झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचे धुमशान बघायला मिळत आहे. कोकणात पावसाने अक्षरशः हैदोस घातला असून, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद्भवली असून, प्रशासनाकडून मदत व बचाव कार्य सुरू आहे. 

8 July Maharashtra Weather : पुढील काही तास सतर्कतेचे, अतिवृष्टीचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने पुढील काही तासांत राज्यात पावसाचा जोर आणखी वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा >> लोकल पकडायला गेली अन् दोन्ही पाय..., नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना 

आयएमडीने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या माहितीप्रमाणे, राज्यातील पुणे, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. 

Maharashtra Weather : कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज, पहा नकाशा

IMD Has issued Red Alert For Maharashtra
भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हवामान कसे असेल, याबद्दल अंदाज मांडला आहे.

मुंबई, ठाणे, अमरावतीला ऑरेंज अलर्ट

मुंबईत पुढील काही तासांमध्ये अतिमुसळधार पडेल, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे या कोकण विभागाला लागून असलेल्या जिल्ह्यांसह विदर्भातील अकोला, अमरावी, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हेही वाचा >> पुणे हादरले! इनोव्हाने उडवले, पोलिसाचा जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp