Maharashtra Weather: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा! पहा IMD चा अंदाज

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा?

point

राज्यातीस 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Weather Rain Forecast : राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. तर काही भागांमध्ये पाऊसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही कालपासून (7 ऑगस्ट) पावसांने विश्रांती घेतली आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१°C आणि २६°C च्या आसपास असेल. (Maharashtra weather live update news today 8th august 2024 rain alert in mumbai pune monsoon news marathi)

हेही वाचा : Vinesh Phogat Retirement: 'आई... मी हरले'; ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची मोठी घोषणा!

राज्यातीस 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात तीव्र पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागात 30 ते 40 किमी/ताशी वेगाने वारे वाहणाऱ्या संभाव्य वादळाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणातील रायगड,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

हेही वाचा : MNS: भाजपसोबत युती नाहीच, राज ठाकरेंनी चौथा उमेदवार केला जाहीर!

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यावर्षी देशात सरासरीच्या 106 टक्के पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT