Maharashtra Weather: बाई... मुंबईत तर पाऊस पडेनाच! तुमच्या जिल्ह्यात IMD चा अंदाज का?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील हवामानाचा अंदाज

point

राज्यातील 'या' भागांना पाऊस झोडपणार!

point

तुमच्या जिल्ह्यात IMD चा अंदाज का?

Mumbai Weather Report Today : गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. पण मुंबईत मात्र पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे. याचबरोबर आज (23 ऑगस्ट) राज्यातील विविध भागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अशावेळी तुमच्या शहरात पावसाचा अंदाज कसा असणार? जाणून घेऊया. (maharashtra Weather news mumbai weather report today 23 august 2024 IMD alert)

आज पुणे, कोकण, मुंबई आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि कोकण या ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ याठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील हवामानाचा अंदाज

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात अंशतः आकाश ढगाळ राहिल, संध्याकाळ / रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35°C आणि 24°C च्या आसपास असेल असा IMD चा अंदाज आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Petrol Pump Scam: सावधान! पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक अशी टाळा; 'इथे' चुकलात तर बसेल मोठा फटका

मात्र, हवमान विभागाचा हा अंदाज गेल्या काही दिवसांपासून फेल ठरत आहे. उकाड्याने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. आता पावसाचा हा अंदाज कधी खरा ठरतोय याची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत आहेत.

राज्यातील 'या' भागांना पाऊस झोडपणार!

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Cheteshwar Pujara : ज्या संघासाठी जीव तोडून खेळला, त्यांनीच दाखवला बाहेरचा रस्ता

दक्षिण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT