Maharashtra Weather: सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट; राज्यातील 'या' भागांमध्ये आज मुसळधार!
Maharashtra Weather News Update : राज्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
राज्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार
अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी
तुमच्या शहरात आज हवामानाचा अंदाज काय?
Maharashtra Weather News Update : राज्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (maharashtra Weather news today 21 august 2024 IMD report of Mumbai pune and these districts)
ADVERTISEMENT
तुमच्या शहरात आज हवामानाचा अंदाज काय?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात मध्यम पाऊस/ मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 26°C च्या आसपास असेल.
हेही वाचा : Bharat Bandh: आज 'भारत बंद'ची हाक! काय सुरू आणि काय बंद राहणार? जाणून घ्या एका क्लिकवर
कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
हवामान विभागाकडून आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा :Badlapur School case चा FIR आला समोर, घटना वाचून तुमच्याही डोक्यात जाईल सणक
याशिवाय, विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, बुलडाणा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांनाही पाऊस झोडपणार आहे. या ठिकाण वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT