Maharashtra Weather: महाराष्ट्रात येत्या 48 तासांत मुसळधार! IMD चा 'या' जिल्ह्यांना धोक्याचा इशारा
Maharashtra Weather News : येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Weather News : सप्टेंबर महिना सुरु होताच राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व विदर्भ आणि तेलंगणावर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, तुमच्या शहरात आज (3 सप्टेंबर) हवामानाचा अंदाज कसा असणार? जाणून घेऊया... (maharashtra Weather update 3 september 2024 marathwada vidarbh IMD alert know mumbai pune weather report )
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुन्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील 48 तासांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात IMD चा अंदाज काय?
हे वाचलं का?
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस/ मेघगर्जनेसह सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30°C आणि 27°C च्या आसपास असेल.
'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा धोक्याचा इशारा
ADVERTISEMENT
कोकणाबाबत बोलायचं तर, कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT