भुजबळांच्या विरोधावर जरांगे भडकले, मराठा अभ्यासक, वकिलांना काय म्हणाले?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoj jarange patil criticize chhagan bhujbal sage soyare maratha reservation obc meeting
manoj jarange patil criticize chhagan bhujbal sage soyare maratha reservation obc meeting
social share
google news

Manoj Jarange Patil Criticize Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणातील ‘सगेसोयरे’बाबत अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रविवारच्या ओबीसी बैठकीत लाखो हरकती दाखल करण्याचे आवाहन ओबीसी समाजाला केले आहे. भुजबळांच्या या आवाहनावर आता मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ‘सगेसोयऱ्यां’बाबत असं म्हणण मांडा की मराठ्यांच्या गोरगरीबांचे कल्याण झाले पाहिजे, अशी विनंती जरांगेनी मराठा अभ्यासक, तज्ज्ञमंडळी आणि वकिलांना केली आहे. (manoj jarange patil criticize chhagan bhujbal sage soyare maratha reservation obc meeting)

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील दोन दिवस रायगड दौऱ्यावर जाणार आहेत. यानिमित्त प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी भुजबळांच्या त्या भूमिकेवर भाष्य करत त्यांच्यावर टीका केली. भुजबळांनी सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर नाराजी व्यक्त केली होती. यावर जरांगे म्हणाले, काहींची उगाच पोटदुखी होतेय, तुला विचारला नसेल म्हणून तुला दुखत असेल आणि तुला काय विचारायचंय, असा हल्ला जरांगेंनी नाव न घेता भूजबळांवर चढवला.

हे ही वाचा : Bigg Boss 17 Winner : डोंगरीचा Munawar Faruqui बिग बॉस विजेता!

रविवारी पार पडलेल्या ओबीसी बैठकीत छगन भुजबळांनी सगेसोयरेच्या अधिसूचनेवर लाखो हरकती दाखल करण्याचे आवाहन ओबीसी समाजाला केले आहे. यावर जरांगे म्हणाले, छगन भुजबळांचा हा धंदा आहे. मराठ्यांचा चांगलं झालेलं त्यांना पाहावत नाही. ओबीसींचाही फायदा झाला पाहिजे अशी आमची नियत आहे. परंतू लोकांच्या अन्नात माती कालवण्याची आमची नियत नाही. त्यामुळे मराठ्यांनी टेन्शन घ्यायचं कारण नाही. कोणालाही कुठेही अडचण आली तर मी आंदोलन करायला तयार आहे.

हे वाचलं का?

तसेच मराठा वकील, अभ्यासकांना आणि तज्ज्ञांना विनंती करत जरांगे म्हणाले की. तुम्ही सगेसोयऱ्यांबाबत असं म्हणणं मांडा की मराठ्यांच्या गोरगरीबांचे कल्याण झाले पाहिजे. कायदा मजबूत झाला पाहिजे, ही झाडून विनंती, तुमची काय शक्ती ती पणाला लावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मराठ्यांनी टेन्शन घ्यायचे नाही. एकाही मराठ्यावर अन्याय होणार नाही, त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहा, नोंदी नाही सापडल्या तरी कुणीच काही टेन्शन घेऊ नका. आणखीण दोन महिने समिती मराठवाड्यात काम करणार आहे. कुणी काही गैरसमज पसरवला, सगळ्या महाराष्ट्राला मिळालंय आणि मराठवाड्यातीला कचून मिळालं आहे. त्यामुळे कचून राहा, असे देखील जरांगे म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Chhagan : भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसींच्या बैठकीत झालेले 3 महत्वाचे ठराव काय?

ओबीसीने आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. या भूमिकेवर जरांगे म्हणाले की, चांगली गोष्ट आहे, त्यांना आंदोलन करू द्या ना, माझी कुठली परवानगी लागतेय, असा टोला देखील त्यांनी भुजबळांना लगावला.मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले अशी चर्चा आहे. या चर्चेवर जरांगे म्हणाले, तह झालेला नाही, मराठे जिंकून आलेले आहेत.सगेसोयरे संदर्भात कायदाही झालेला आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT