Manoj Jarange : 'जरांगेंना अक्कल नाही, लोकांची फसवणूक करतो.. त्याच्या पोरीलाही अहंकार', बारसकर महाराजांचे खळबळ उडवून देणारे आरोप..
Ajay Bavaskar Allegation on Manoj Jarange, Maratha Reservation : 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग घेतली, लोणावळा, वाशी समाजाला वगळून मिटिंग घेतली,' असे खळबळ उडवून टाकणारे आरोप अजय बारसकर महाराज यांनी मनोज जरांगे पाटलांवर पत्रकार परिषद घेऊन केले आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'जरांगेला काडीची अक्कल नाही'
'जरांगे यांनी तुकाराम महाराजचा अपमान केला'
लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मिटिंग केली
Ajay Bavaskar Allegation on Manoj Jarange, Maratha Reservation : 'तो (मनोज जरांगे) हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहतो. रोज पलटी मारतो तो, 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग घेतली, लोणावळा, वाशी समाजाला वगळून मिटिंग घेतली,' असे खळबळ उडवून टाकणारे आरोप अजय बारसकर महाराज यांनी मनोज जरांगे पाटलांवर पत्रकार परिषद घेऊन केले आहेत. नेमकं ते काय म्हणालेत? जाणून घेऊयात. (maratha reservation ajay bavaskar big allegation on manoj jarange patil cm eknath shinde)
ADVERTISEMENT
'मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळातही अंतरवालीत घटना घडली, तेव्हा मी आंदोलनाच्या लढ्यात सहभागी झालो होतो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो', असे अजय बारसकर यांनी सांगितले.
हे ही वाचा : Gajanan Kirtikar : 'शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली चालणार नाही'
'मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहतो', अशी टीका बारसकर यांनी मनोज जरांगेंवर केली. 'जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे, अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःच काय', असा टोलाही बारसकर यांनी जरांगेना लगावला.
हे वाचलं का?
'मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो.त्यामुळे जरांगेच्या प्रत्येक कृतीला मी साक्षी आहे. त्यामुळे काही दिवसापासून माझ्या मनातील खदखद व्यक्त केली. मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू माजला का. पण माझं काम सत्य सांगणं आहे, असे बारसकर म्हणाले. मी प्रसिद्धी साठी किंवा पैशासाठी करतोय, मात्र बिलकुल नाही मी कीर्तनाचेही पैसे घेत नाही', असे बारसकर यांनी सांगितले.
हे ही वाचा : उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीवर शिक्कामोर्तब! काँग्रेस किती जागा लढवणार?
दरम्यान 'जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो, मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायले तर मी मोठा होईल, म्हणून तो नाय प्यायला, अन मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्यात...तिथून माझा वाद सुरु झाला…'असे बासरकर महाराज सांगतात.
ADVERTISEMENT
'जरांगे यांनी तुकाराम महाराजचा अपमान केला. जरांगेची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल, इतका अंहकार मुलांमध्ये...सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का?' असा सवाल बारसकर महाराज यांनी यावेळी केला.
ADVERTISEMENT
तसेच 'हा माझ्यावर आरोप करतो सरकार आणि भुजबळ यांचा माणूस. पण माझा आणि कोणाचा संबंध नाही. पण तो रोज पलटी मारतो. सगळ्या मिटिंग कॅमेरावर करतो, पण 23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांने केली. मी याला साक्षी आहे. त्याने लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मिटिंग केली', असा गंभीर आरोप बारसकर महाराज यांनी केली.
अजय बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी
मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय बासरकर यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनी केलेल्या या आरोपानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्यांना पक्ष संघटनेतर्फे बडतर्फे करण्यात आले आहे. यासंबंधी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र जवंजाळ यांनी एक पत्र काढत, त्यांचा आजपासून पक्षाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT