Mazi Ladki Bahin Yojana: ठरलं.. 1500 रुपये 'या' दिवशी जमा होणार तुमच्या बँकेत!
Mazi Ladki Bahin Yojana: खरं तर लाडकी बहिण योजनेची सुरूवात 1 जुलैपासून झाली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात जुलैपासूनच पैसै जमा होणार आहेत. मात्र अद्याप अर्ज प्रक्रियाच पुर्ण न झाल्याने खात्यात पैसै कधी जमा होणार? असा प्रश्न महिलांना पडला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहिण योजनेची सुरूवात 1 जुलैपासून झाली आहे.
अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती.
1 ऑगस्टला पात्र लाभार्त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
Mazi Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'ची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात 1500 रूपये जमा होणार आहेत. या योजनेसाठी सध्या महिलांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र महिलांच्या खात्यात नेमकी रक्कम कधी जमा येणार? याची माहिती समोर आली नव्हती. आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. (ladki bahin yojana scheme on these date 1500 rs amout will be deposite in bank)
ADVERTISEMENT
खरं तर लाडकी बहिण योजनेची सुरूवात 1 जुलैपासून झाली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात जुलैपासूनच पैसै जमा होणार आहेत. मात्र अद्याप अर्ज प्रक्रियाच पुर्ण न झाल्याने खात्यात पैसै कधी जमा होणार? असा प्रश्न महिलांना पडला आहे. यावर आता मोठी अपडेट समोर येत आहेत.
हे ही वाचा : Sharad Pawar : विधानसभेत महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? पवारांनी थेट आकडाच सांगितला
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत अर्ज करण्याची मुदत सुरूवातीला 15 जुलै होती. या मुदतीनंतर तलाठी आणि सेतू कार्यालयात दाखले घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. ही गर्दी टाळण्यासाठी नंतर सरकारने अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीने महिलांना दिलासा मिळाला होता.
हे वाचलं का?
आता 16 जुलैला तात्पुरत्या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 1 ऑगस्टला पात्र लाभार्त्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर लाडकी बहिण योजनेचे पैसै 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होण्याच्या प्रक्रिया सुरूवात होईल. आणि 15 ऑगस्टला पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. ऑगस्टनंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या खात्यात पैसै जमा होणार आहेत.
योजनेत पात्र ठरण्यासाठी 'ही' कागदपत्रे लागणार
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवाशी असावी. त्यासाठी रहिवाशी प्रमाणपत्र वा जन्म दाखला प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा आणखी पाय खोलात, मॉक इंटरव्ह्यू अडचणी वाढणार? Video Viral
शासनाने या नियमामध्ये सुधारणा केली आहे. सुधारित निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र नसेल, तर त्याऐवजी अर्जदाराचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
ADVERTISEMENT
दुसऱ्या राज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असल्यास, तिच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
1) आधार कार्ड
2) बँक पासबुकची झेरॉक्स
3) उत्पन्नाचा दाखला
4) रहिवाशी प्रमाणपत्र
योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न २५०००० पेक्षा जास्त नसावे अशी अट सरकारने घातलेली आहे. त्यासाठी उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.पण, सक्षम अधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला नसेल, तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आवश्यक असणार आहे. पिवळे रेशन कार्ड आणि केशर रेशन कार्ड धारक महिलांना उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT